लाडाची लेक आता लढणार सीमेवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:42 AM2021-08-22T04:42:20+5:302021-08-22T04:42:20+5:30

स्टार १०७६ अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एनडीए) प्रवेश परीक्षा आता मुलींनाही देता येणार ...

Lada's Lake will now fight on the border! | लाडाची लेक आता लढणार सीमेवर !

लाडाची लेक आता लढणार सीमेवर !

Next

स्टार १०७६

अनिकेत घमंडी

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एनडीए) प्रवेश परीक्षा आता मुलींनाही देता येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे लवकरच नेशन फर्स्टचा नारा आता मुलीही देणार आहेत. त्याकरिता लाडाची लेक सीमेवर लढण्यासाठी सज्ज झाली आहे.

सध्या शाळा, महाविद्यालये बंद असल्याने एनसीसी कॅडेट्समध्ये या निर्णयाची फारशी जागृती झालेली नाही. मात्र, तरीही ज्यांना या निर्णयाबाबत कळले आहे, त्यापैकी मुलींमधील कॅडेट्सनी खूप आनंद व्यक्त केला आहे. तसेच आम्हाला लढायला किंवा देशसेवा करायला जायला आवडेल, अशाच प्रतिक्रिया दिल्या आहेत. रेडी फॉर एव्हर, आणि नेशन फर्स्ट, असे सांगून त्यांनी राष्ट्रध्वजाचे स्मरण करून सलामी दिली.

-------------

काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल?

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एनडीए) प्रवेश परीक्षा आता मुलींनाही देता येणार असल्याने युवतींचा राष्ट्रसेवा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

------------

लष्करात प्रवेशासाठी...

एनडीए, आयएमए आणि ओटीए या तीन माध्यमांद्वारे लष्करात प्रवेश करता येतो. त्यासाठी पुणे-खडकी, डेहराडून, सातारा सैनिक शाळा, अशी एनडीए कॅडेट्सची शाळा, कॉलेज आहेत. त्या ठिकाणी सहावी, आठवी आणि नववीला साधारणपणे प्रवेश परीक्षा असते. त्याचे ऑनलाइन फॉर्म सतत निघत असतात. वयाची अट ही प्राथमिक असून, ती पूर्ण केली तरच प्रवेश परीक्षा देता येते. खूप शिस्तबद्ध वातावरणात तेथील शिक्षण, प्रशिक्षण असते.

-------

लेकींनी मानले न्यायालयाचे आभार !

सर्वोच्च न्यायालयाने १८ ऑगस्टला मुलींसाठी एनडीएची परीक्षा देण्यास मुभा देण्याचा निर्णय घेतला असून, तो अतिशय स्वागतार्ह आहे. ज्यांनी शाळेतच एनसीसीचे प्रशिक्षण घेतले आहे, अशा मुलींची भारतीय संरक्षण दलात सेना अधिकारी म्हणून भरती होण्याची महत्त्वाकांक्षा असते. सर्व मुलींसाठी आतापर्यंत केवळ ओटीए व एमएनएस हे दोनच पर्याय उपलब्ध होते. मात्र, आता एनडीए ही एक सुवर्णसंधी नक्कीच ठरेल. या निर्णयाने मुलीही सर्व क्षेत्रांत मुलांएवढीच क्षमता बाळगू शकतात, हे नक्कीच सिद्ध होणार आहे, याची मला खात्री आहे.

- जयश्री बाविस्कर

-------------

सैन्य म्हटले की समोर येते ते खडतर प्रशिक्षण आणि देशाला समर्पित आयुष्य. आयएमए, ओटीए व एनडीए येथे प्रशिक्षण घेऊन लष्करात भरती होता येते. एनडीएची स्वतःची स्वतंत्र प्रवेश परीक्षा व प्रशिक्षण प्रणाली आहे. परंतु, आतापर्यंत एनडीए हे पुरुषांसाठी मर्यादित होते. न्यायालयाच्या निर्णयानुसार मुली-महिलांनाही आता एनडीएत प्रवेश खुला झाला आहे. यामुळे सैन्यात महिलांना असलेल्या संधींची भर पडलीच आहे. त्यासोबतच एनडीए प्रवेश बारावीनंतर असल्याने पदवीपर्यंत न थांबता लवकरात लवकर देशसेवेत रुजू होण्यासाठी महिला तयार होतील. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत आहेत, याला आता भारतीय सैन्यही अपवाद राहिलेले नाही. एनडीएच्या प्रवेशामुळे सैन्यात महिलांची संख्या वाढून अधिकाधिक मुलींना प्रोत्साहन मिळेल.

- वेदिका बुचके

-----------------------

प्रशिक्षक प्रतिक्रिया :

सर्वोच्च न्यायालयाने खूप मोठा निर्णय दिला आहे. हा पूर्वीच द्यायला हवा होता. शहरातील कॉलेज, शाळा आदी ठिकाणचे मिळून सुमारे ३०० कॅडेट्स आहेत. त्यापैकी १०० मुली कॅडेट्स असतील. विद्यानिकेतन शाळेचा स्वतंत्र विंग्ज पॅरा कमांडो ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न असतो. त्यासाठी तेथे विशेष प्रशिक्षण देण्यात येते.

- उदय नाईक, एनसीसी कॅडेट्स प्रशिक्षक

--------------------

तिघांचे फोटो मेलवर

Web Title: Lada's Lake will now fight on the border!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.