लखोबा लोखंडेचा मीरा रोडमध्ये नवा अवतार : ७ गुन्हे दाखल

By admin | Published: September 1, 2015 04:31 AM2015-09-01T04:31:15+5:302015-09-01T04:31:15+5:30

अपत्य असलेल्या विधवा, घटस्फोटीत व ३५ ते ४० वयाच्या अविवाहित महिलांना गाठून त्यांच्याशी पत्नी व मेव्हण्याच्या प्रयत्नातून विवाह करायचा.

Lakhoba Lokhande's new incarnation in Mira Road: 7 cases filed | लखोबा लोखंडेचा मीरा रोडमध्ये नवा अवतार : ७ गुन्हे दाखल

लखोबा लोखंडेचा मीरा रोडमध्ये नवा अवतार : ७ गुन्हे दाखल

Next

भार्इंदर : अपत्य असलेल्या विधवा, घटस्फोटीत व ३५ ते ४० वयाच्या अविवाहित महिलांना गाठून त्यांच्याशी पत्नी व मेव्हण्याच्या प्रयत्नातून विवाह करायचा. अपत्य झाल्यानंतर त्या महिलेला लुटून पोबारा करणाऱ्याच्या रुपाने लखोबा लोखंडेचा मीरारोड व भार्इंदर पूर्वेच्या नवघर परिसरात नवा अवतार थैमान घालत असल्याचे पोलिसांच्या तपासातून उघडकीस आले आहे.
हा लखोबा लोखंडे, संजय शंकर सगळे, सगळे-पाटील, संजय शंकर सांगळे, संजय शंकर पाटील, अविनाश शंकर पाटील, मनोहर शंकर पाटील, मनोहर शंकर शेळके, अजित आर्या आदी नावे धारण करून महिलांना हेरतो. त्यांच्यासोबत विवाह करण्याचा प्रस्ताव सादर करण्यासाठी तो आपल्या खऱ्या पत्नीला आपली बहिण बनवून तिच्या भावाच्या सहकार्याने पिडीत महिलांच्या नातेवाईकांना गाठतो. हे दोघे हा लखोबा इंजिनियर, वकील किंवा प्राध्यापक असल्याचे भासवून त्यांचा विवाह लावून देतात.
विवाहानंतर तो अपत्य होईपर्यंत त्या महिलांसोबत वास्तव्य करतो. त्यादरम्यान तो त्यांच्याकडून रक्कमेसह दागिने हडपतो. अपत्य झाल्यानंतर तो काही दिवसांतच त्या महिलांना सोडून अन्यत्र पळ काढून आपले लखोबाकांड सुरु ठेवतो. या लखोबाचे मुख्य कुटुंब भार्इंदर पूर्वेच्या नवघर परिसरात राहत असून त्याच्या दोन मुली त्याच परिसरातील एका महाविद्यालयात शिकत आहेत. या घटनांतील विशेष बाब म्हणजे तो लुटलेला मुद्देमाल आपल्या जवळ ठेवत नाही. त्यातून घेतलेली मालमत्ता आपल्या नावे करीत नाही. परंतु, त्याच्या सिन्नर तालुक्यातील दोडी गावात शेतजमीन व अन्य मालमत्ता असून त्या वडीलांच्या नावे आहेत.
या लखोबाचे दुष्यकृत्य अहमदनगर पोलिसांत एका पिडीत महिला वकिलाने दाखल केलेल्या तक्रारीमुळे चव्हाट्यावर आले असून आतापर्यंत अहमदनगरमध्ये एका शिक्षिकेसह ४ तर कोल्हापूरमध्ये एका महिला पोलीसासह शिक्षिका, वकील असे तीन असे एकूण सात गुन्हे दाखल झालेले आहेत. अहमदनगर गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक राहुल गायकवाड यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Lakhoba Lokhande's new incarnation in Mira Road: 7 cases filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.