भिवंडीच्या डोंगरातील जंगलास आग,वनाधिकाऱ्यांची बघ्याची भूमीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 01:34 AM2018-10-30T01:34:44+5:302018-10-30T02:09:12+5:30

भिवंडी : भिवंडी -वसई मार्गावरील खारबाव गावालगत असलेल्या तुंगारेश्वर डोंगरातील जंगलात सोमवार रात्री आठ वाजताच्या सुमारास अचानक वणवा भडकल्याने ...

The land of the forest of Bhiwandi mountains, the land of the forest | भिवंडीच्या डोंगरातील जंगलास आग,वनाधिकाऱ्यांची बघ्याची भूमीका

भिवंडीच्या डोंगरातील जंगलास आग,वनाधिकाऱ्यांची बघ्याची भूमीका

Next
ठळक मुद्देआॅक्टोबर हिटने जंगलातील सुकले गवत व साचला पाळापाचोळाआगीत जळाले पावसाळ्यात बहरलेले वृक्षआगीने वनसंपदा धोक्यात,उपाययोजनाची गरज

भिवंडी: भिवंडी-वसई मार्गावरील खारबाव गावालगत असलेल्या तुंगारेश्वर डोंगरातील जंगलात सोमवार रात्री आठ वाजताच्या सुमारास अचानक वणवा भडकल्याने जंगलातील वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही आग विझवण्यासाठी वनविभागाकडे कोणतीही व्यवस्था नसल्याने त्यांनी बघ्याची भूमीका घेतली.
सध्या आॅक्टोबर हिट पसरल्याने जंगलातील वाढलेले गवत व झाडांचा पालापाचोळा सुकून पडलेला आहे. त्यामुळे तेथे पडलेली छोटी ठिणगीने आगीचे रु प धारण केले. सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जंगलात अचानक लेगलेल्या आगीचा वणवा झाला तरी ही आग विझविण्याचे उपाययोजना सरकारी यंत्रणेकडे नव्हती. त्यामुळे घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी आले नाहीत. हा वणवा नियंत्रणाच्या बाहेर जाऊन जंगलातील अनेक झाडे जळून भस्मसात झाली. हे जंगल मांडवी वनपरिक्षेत्राच्या अंतर्गत येते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभागाकडे कोणतीही उपाययोजना नव्हती. त्यामुळे डोंगराला लागलेली आग बघण्यापलीकडे वन अधिकाºयांना काहीच करता आले नाही. पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडे लावा, झाडे जगवा अशी गर्जना करणाºया सरकारने भविष्यात वाढलेल्या वनसंपदेचे नुकसान टाळण्यासाठी कठोर उपाय योजना हाती घेणे गरजेचे आहे. आधीच ग्रामिण भागातून जाणारे रस्ते व विविध योजनांमुळे वृक्षहानी होत आहे. त्यातच वर्षानुवर्षे बहरलेली वनसंपदा रक्षणासाठी परिसरांतील नागरिक प्रयत्न करीत असतात. तरी देखील तालुक्यातील जंगलात वृक्षतोडीचे प्रकार घडून साग व बहुपयोगी झाडांची तस्करी होत असते. अशा स्थितीत पावसाळ्यात तोडलेल्या वृक्षांना अंकूर फुटून आपोआप जंगल वाढत असते. मात्र असे वणवे पेटल्यास जंगलात रहाणाºया श्वापदे आाणि इतर जनावरे आसºयासाठी लोकवस्तीत धाव घेतील अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वणव्याच्या आगीवर नियंत्रण करण्याची साधने शासनाने निर्माण केली पाहिजे. तरच आगीने धोका झालेली वनसंपदांचे संरक्षण करता येणे शक्य आहे.,अशा प्रतिक्रीया परिसरांतील नागरिकांनी व्यक्त केल्या.

Web Title: The land of the forest of Bhiwandi mountains, the land of the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.