पोमणला शेततळ्याचे भूमीपूजन

By admin | Published: May 30, 2017 05:05 AM2017-05-30T05:05:11+5:302017-05-30T05:05:11+5:30

भारतीय जनता पार्टीच्या शिवार संवाद अभियानात मागेल त्याला शेततळे अभियानाची सुरुवात वसईच्या पोमण या गावातून करण्यात आली

Land of Pamon | पोमणला शेततळ्याचे भूमीपूजन

पोमणला शेततळ्याचे भूमीपूजन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : भारतीय जनता पार्टीच्या शिवार संवाद अभियानात मागेल त्याला शेततळे अभियानाची सुरुवात वसईच्या पोमण या गावातून करण्यात आली. आमदार संजय केळकर यांनी भूमीपूजन करून शेततळे अभियानाचे उद्घाटन केले.
शिवार संवाद अभियानाच्या निमित्ताने त्यांनी वसईचा दोन दिवसाचा दौरा केला. शेतकरी सुशांत पाटील यांनी त्याचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या हस्ते मागेल त्याला शेततळे योजनेतून पाटील यांना मंजूर झालेल्या शेततळ््याचे भूमीपूजनही करण्यात आले. दोन दिवसाच्या दौऱ्यात त्यांनी वसई तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी राज्य तसेच केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली गेली. तसेच या योजनांच्या अंमलबजाणीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्याची माहिती भाजपाचे उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी दिली.

Web Title: Land of Pamon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.