माळशेज घाटात भुस्खलन सुरूच; दगड - माती हटवण्यात पावसाचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 07:33 PM2018-08-23T19:33:34+5:302018-08-23T19:37:54+5:30

रस्त्यावरील दगड-माती हटवण्याचे काम माळशेज घाटातील छत्री पॉर्इंट या ठिकाणी सुरू आहे. घाटातील या ठिकाणाची केएम ९१/०० एनएच ६१ अशी नोंद केलेली आहे. या ठिकाणचे काम शुक्रवारीदेखील पावसाचा आंदोज घेऊन करावे लागेल. आतापर्यंत छोटी गाडी पास होईल, असा रस्ता मोकळा झाला. शुक्रवारी तो पूर्ण मोकळा होण्याची अपेक्षा महाजन यांनी व्यक्त केली.

 Landslide in Malsege Ghat; Stone - rain interruption in soil removal | माळशेज घाटात भुस्खलन सुरूच; दगड - माती हटवण्यात पावसाचा अडथळा

तरीदेखील रस्त्यावरील ७० टक्के दगड- माती गुरुवारी हटवण्यात आली

Next
ठळक मुद्देनैसर्गिक अपत्तीत खबरदारीची उपाययोजना म्हणून काही दिवस घाट बंद रस्त्यावरील दगड-माती हटवण्याचे काम माळशेज घाटातील छत्री पॉर्इंट या ठिकाणीकोसळलेल्या दरडीचा काही भाग डोंगराच्या सुळक्यावर अडकला


ठाणे / टोकावडे : माळशेजघाटातील रस्ता गुरुवारी संध्याकाळपर्यंत  मोकळा होईल, अशी अपेक्षा होताी. परंतु, पावसाचा जोर आणि धुके यामुळे कामात व्यत्यय येत आहे. याशिवाय डोंगर माथ्यावरून भूस्खलन सुरूच आहे. यामुळे मोठमोठे दगड निखळण्याची भीती आहे. तरीदेखील रस्त्यावरील ७० टक्के दगड- माती गुरुवारी हटवण्यात आली. मात्र, नैसर्गिक अपत्तीत खबरदारीची उपाययोजना म्हणून काही दिवस घाट बंद ठेवण्याच्या हालचाली सुरू आहेत.
दाट धुके आणि पाऊस यामुळे रस्त्यावरील मातीचा खच उचलण्यास अडथळा येत आहे. या ठिकाणी दोन मशीन्स दगड, माती हटवण्याचे काम करीत आहेत. डोंगरकड्यावरून दगड - माती निखळत तर नाही ना, याचा आंदोज घेऊनच काम करावे लागत आहे. तरीदेखील एक गाडी जाईल, एवढा रस्ता गुरुवारी मोकळा झाला. रस्त्यावर १०० मीटर पेक्षा अधिक असलेला मातीचा खच सुमारे ७० टक्के हटवला. शुक्रवारी तो मोकळा होण्याची शक्यता आहे. परंतु, बुधवारी कोसळलेल्या दरडीचा काही भाग डोंगराच्या सुळक्यावर अडकला आहे. तो खाली पडल्यानंतर पुन्हा रस्त्यावर दगड माती होईल. गुरूवारी सायंकाळपर्यंत भर पावसात काम जीव धोक्यात घालून करावे लागल्याचे कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता दिनेश महाजन यांनी सांगितले.
रस्त्यावरील दगड-माती हटवण्याचे काम माळशेज घाटातील छत्री पॉर्इंट या ठिकाणी सुरू आहे. घाटातील या ठिकाणाची केएम ९१/०० एनएच ६१ अशी नोंद केलेली आहे. या ठिकाणचे काम शुक्रवारीदेखील पावसाचा आंदोज घेऊन करावे लागेल. आतापर्यंत छोटी गाडी पास होईल, असा रस्ता मोकळा झाला. शुक्रवारी तो पूर्ण मोकळा होण्याची अपेक्षा महाजन यांनी व्यक्त केली.
*रस्ता एक दिवस अंडर कंट्रोल ठेवणार
रस्ता मोकळा झाल्यानंतरही वाहकाच्या जिवीतास धोका होऊन नये यासाठी सुमारे एक दिवसाकरीता रस्ता ‘अंडर कंट्रोल’ ठेवावा लागेल. त्यानंतर घाटातील वाहतूक सुरू ठेवायची की नाही, याचा निर्णय घ्यावा लागेल. सुळक्यावरून खाली दगड येताच आम्हाला पळतच छत्री पॉर्इंटवर येऊन थांबावे लागत आहे. नैसर्गिक आपत्ती आहे, त्यासंदर्भातील निर्णय घाईगर्दीत घेणे योग्य होणार नाही, असे मुरबाडचे पोलीस निरिक्षक डी. सी. पोरे यांनी लोकमतला सांगितले.
मंगळवारी पहाटे या घाटात दरड कोसळून एक टेम्पो चालक जखमी झाला. मात्र, टेम्पोचा चक्काचूर झाला. आजच्या तिसऱ्या दिवशीदेखील रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे .पावसाचा जोर पाहून ते अधून मधून बंद करावे लागत आहे. डोंगराच्या सुळक्यावर आडकलेले दगड कोसळून जिवीत हाणी होऊ नये म्हणून अंदाजे दोन दिवस तरी वाहतूक बंद ठेवावी लागणार असल्याचे आमच्या स्थानिक टोकावडे वार्ताहराने कळवले आहे.
..............
फोटो - २३ठाणे माळशेज घाटात केलेला मोकळा रस्त्या

Web Title:  Landslide in Malsege Ghat; Stone - rain interruption in soil removal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.