अंध विद्यार्थ्याला दिला लॅपटॉप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:46 AM2021-09-14T04:46:44+5:302021-09-14T04:46:44+5:30
मुरलीधर भवार लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : सामाजिक बांधीलकी जपणारा उत्सव साजरा करणाऱ्या कल्याणच्या विजय तरुण मंडळाने एका ...
मुरलीधर भवार
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : सामाजिक बांधीलकी जपणारा उत्सव साजरा करणाऱ्या कल्याणच्या विजय तरुण मंडळाने एका अंध विद्यार्थ्याला शिक्षणासाठी लॅपटॉप दिला. त्यांचा आदर्श अन्य मंडळांनीही जपायला पाहिजे.
श्रीकांत घुगे हा कल्याणचा रहिवासी अंध आहे. त्याने बारावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळविले होते. त्याच्या आई-वडिलांचे काम कोरोनाकाळात गेले. घरची परिस्थिती बेताची आहे. तसेच त्याची बहीणही अंध आहे. त्यामुळे दोन्ही अंध मुलांना जगण्यासाठी उभे कसे करावे, असा प्रश्न घुगे कुटुंबापुढे आहे. विजय तरुण मंडळाने गतवर्षी घुगे याचा उत्तम गुण मिळविल्याबद्दल सत्कार करून त्याच्या शिक्षणासाठी ५० हजार रुपयांची मदत केली होती. घुगे याला बिर्ला कॉलेजमध्ये कला शाखेत प्रवेश मिळाला. त्याला भविष्यात आयएएस व्हायचे आहे. घुगे अंध असल्याने त्याला ऐकून अभ्यास करता यावा, यासाठी मंडळाने यंदाच्या वर्षी त्याला लॅपटॉप दिला. तसेच मयूरी सूर्यवंशी या तरुणीला मेंदूत गाठ झाली असून, तिला शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत मंडळाने दिली आहे.
दरम्यान, विजय साळवी हे मंडळाचे संस्थापकीय विश्वस्त आहेत, तर नदीम आगा हे अध्यक्ष आहेत. भागवत बैसाणे, विनोद पवार, अरुण शेलार आदी कार्यकर्ते सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न करीत आहेत.
---------------