वकिलाच्या कार्यालयातून लॅपटॉप चोरणा-यास रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 02:16 AM2017-10-10T02:16:02+5:302017-10-10T02:16:18+5:30
नौपाड्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या भागांत चोरीच्या दोन घटना घडल्या. यातील चरईतील एका महिला वकिलाच्या कार्यालयातून लॅपटॉप लांबवणा-या अफरोज शेख
ठाणे : नौपाड्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या भागांत चोरीच्या दोन घटना घडल्या. यातील चरईतील एका महिला वकिलाच्या कार्यालयातून लॅपटॉप लांबवणा-या अफरोज शेख (२६) या चोरट्याला मात्र नागरिकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याला ११ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून त्याच्याकडून चोरीतील लॅपटॉपही हस्तगत केला आहे.
कळव्याच्या भास्करनगर भागात राहणाºया अफरोज याने ८ आॅक्टोबर रोजी पहाटे ३ वा.च्या सुमारास चरईच्या काबाडआळीतील आनंदवन या इमारतीच्या तळ मजल्यावरील अॅड. स्वाती प्रधान-चिटणीस यांच्या कार्यालयाच्या दरवाजाचे लॅच तोडून साथीदारासह आत शिरकाव केला. तो या कार्यालयाचे लॅच तोडत असतानाच इमारतीमधील एका रहिवाशाने ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षासह इमारतीमधील इतर रहिवाशांनाही फोनवरून ही माहिती दिली. योगायोगाने या इमारतीच्या जवळूनच नौपाडा पोलिसांच्या गस्तीची मोबाइल व्हॅन जात होती.
नियंत्रण कक्षातून बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे माहिती मिळताच उपनिरीक्षक शिरीष यादव यांचे पथकही अवघ्या चार ते पाच मिनिटांमध्ये पोहोचले. तोपर्यंत तिथे जमा झालेल्या नागरिकांनी अफरोजला लॅपटॉपसह पकडले. मात्र, या धुमश्चक्रीत त्याचा दुसरा साथीदार पसार झाला. पोलिसांनी त्याच्याकडून लॅपटॉप तसेच कटर, वायर कटावणी, रिंग पाना आणि इतर चोरी करण्यासाठीची सामग्री हस्तगत केली. ठाणे न्यायालयाने त्याला सोमवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली.
तर, अन्य एका घटनेत सनमीत राजेभोसले यांच्या कॅण्डी किसेस, जीवनतारा, शॉप क्रमांक ६, विष्णुनगर येथील दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून ३ हजार ३२० ची रोकड तसेच लॅपटॉप असा २३ हजार ३२० रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पलायन केल्याची घटना ८ आॅक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस उपनिरीक्षक तृप्ती खळदे या तपास करत आहेत.