आरोग्य व्यवस्था मोजतेय अखेरच्या घटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 12:25 AM2019-04-08T00:25:01+5:302019-04-08T00:26:03+5:30

जागतिक आरोग्य दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था कशी आहे, याचा आढावा घेतला असता स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या शहरातही आरोग्य व्यवस्था रामभरोसे आहे

The last element to measure the health system | आरोग्य व्यवस्था मोजतेय अखेरच्या घटका

आरोग्य व्यवस्था मोजतेय अखेरच्या घटका

Next

जागतिक आरोग्य दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था कशी आहे, याचा आढावा घेतला असता स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या शहरातही आरोग्य व्यवस्था रामभरोसे आहे. सरकारी, पालिका तसेच ग्रामीण भागातील रूग्णालयात केवळ भोंगळ कारभार नजरेस पडला. रूग्ण, रूग्णांच्या नातेवाइकांच्या पदरी त्रासाशिवाय दुसरे काहीही मिळत नाही. नेमकी हीच परिस्थिती, तेथील दुरवस्था ‘लोकमत’चे प्रतिनिधी पंकज रोडेकर, मुरलीधर भवार, कुमार बडदे, सदानंद नाईक, राजेश जाधव, जनार्दन भेरे, वसंत पानसरे, श्याम राऊत यांनी मांडली आहे.

णे जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या दुरवस्था झालेल्या इमारती पाडून त्या जागी नव्याने सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यानुसार, या रूग्णालयातील विविध विभाग वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरीत केले जाणार आहेत. सद्यस्थितीत, जिल्हा रुग्णालय हे ३६७ खाट्यांचे आहेत. त्यासाठी रुग्णालयाकरिता जवळपास ५२२ पदे मंजूर आहेत. त्यानुसार, रूग्णालयात ४०४ पदे भरण्यात आलेली आहेत. तर,मंजूर पदांपैकी रूग्णालयातील ११८ पदे रिक्त आहेत. यात प्रामुख्याने त्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची ११ पदे रिक्त आहेत. त्यापाठोपाठ असलेल्या श्रेणीत दोन डॉक्टर कमी आहेत. तसेच तृतीय श्रेणीतील २६३ पैकी २९ आणि चतुर्थ श्रेणीतील २०३ पैकी ७६ पदे अद्याप भरण्यातच आलेली नाहीत. चतुर्थ श्रेणीतील रिक्त असलेल्या पदांची भरती प्रक्रियाही न्यायप्रविष्ट आहे.


जिल्ह्यातील गोरगरिबांचे रूग्णालय अशी ओळख असलेल्या या रुग्णालयात जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातून मोठ्या प्रमाणात रूग्ण उपचारासाठी येत असतात. दिवसाला साधारणत: एक हजार ते १२०० रुग्ण उपचारासाठी येत असल्याने वर्षाचे बाराही महिने हे रुग्णालय नेहमीच गजबजलेले असते. उपचाराकरिता येणाऱ्या रूग्णांच्या नातेवाईकांना अंग टेकवण्याचे सोडाच, पण त्यांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्थाही नाही. त्यामुळे बहुतांश रूग्णांचे नातेवाईक वॉर्डच्या बाहेर ताटकळत असल्याचे किंवा तेथे झोपल्याचे नेहमीच दिसते. दोन घटनांवरून रूग्णालयाच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. रूग्णासोबत असलेली तरूणी ही मध्यंतरी वॉर्डच्या बाहेर झोपलेली असताना, एक तरूण तेथे येत त्याने तिच्यासोबत गैरवर्तन केले. तर रूग्णालयातून बाळ चोरीला गेल्याची ही घटना वर्षभरापूर्वी घडली होती.


जिल्हा रूग्णालयातील प्रसूती वॉर्ड हे नेहमीच फुल्ल असतो. मध्यंतरी, प्रसूती होणाºया महिलेसह नवजात शिशुला चक्क लादीवर गादी घालून तेथे झोपवले होते. त्यानंतर, प्रसूती होणाºया महिलांसाठी एक नवीन वॉर्ड तयार करण्यात आला. मात्र, प्रसूती वॉर्डमधील स्वच्छतागृहाबाबत रूग्णांच्या नातेवाईकांकडून नेहमीच आरोप केला जातो. तसेच कर्मचारीही नीट वागत नसल्याचे नातेवाईकांचे म्हणणे असते. येथील डॉक्टर हे खाजगी ठिकाणी प्रॅक्टिस करतात असेही आरोप केले जातात. मध्यंतरी शवागृहात वाढणाºया मृतदेहांमुळे तेथील वातानुकूलित यंत्रणेत बिघाड होऊन तेथील कामकाज ठप्प झाले होते. त्यावेळी दुर्गंधी पसरण्यास सुरूवात झाल्याने मृतदेह ठेवायचे कुठे तसेच त्याची तातडीने विल्हेवाट कशी लावायची यासारखे प्रश्न त्यावेळी निर्माण झाले होते. त्यातच रूग्णालयाची जमेची बाजू म्हणजे, या रूग्णालयात उपचारासाठी दाखल होणाºया रूग्णांवर व्यवस्थित उपचार केले जातात. मग त्याच्यासोबत नातेवाईक असो वा नको. वेळप्रसंगी अनोळखी दाखल होणाºया रूग्णांना त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्याचे कामही रूग्णालय प्रशासनाने केलेले वारंवार समोर आले आहे.


ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातही रिक्त पदांची बोंबाबोंब आहे. येथे वैद्यकीय महाविद्यालयही आहे. हे रूग्णालयही ५०० खाटांचे असून येथे २०१५ च्या मंजूर पदांची संख्या ७९० इतकी आहे. त्यापैकी जवळपास १०० पदे रिक्त आहेत. येथील बाह्यरूग्ण विभागात येणाºया रूग्णांची संख्या १६०० ते १८०० इतकी आहे. या रूग्णालयात परराज्यातूनही रूग्ण उपचारासाठी येत असतात. पाच वर्षांपूर्वी या रुग्णालयात येणाºया रुग्णांची संख्या ५०० ते ८०० होती. जिल्ह्यातील इतर रूग्णालयात रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नसल्याने तेथील रुग्णांचा भार छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयावर पडत असल्याचे बोलले जाते.

डॉक्टरांसह परिचारिकांचीही कमतरता, मुंब्य्रातील रुग्णांची ससेहोलपट
ठाणे महापालिकेच्या मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत राहत असलेल्या नागरिकांसाठी दोन आरोग्य केंद्रे आहेत. यातील,पहिले आनंद कोळीवाडा परिसरात आहे. या रूग्णालयात ओपीडी विभाग तसेच प्रसूतीगृह सुरू आहे. येथील जीवनबाग, स्टेशन परिसर, गावदेवी, सम्राट नगर, संजय नगर,नारायण नगर आदी परिसरातील एक लाख ५० हजार रूग्ण या रूग्णालयात औषधोपचारांसाठी येतात.
या रूग्णालयात उपचारांसाठी येणाºया रूग्णांच्या दृष्टीने ते अतिशय छोटे आहे. येथे मोठ्या प्रमाणावर बाह्य रूग्ण विविध आजारांवर उपचारांसाठी येतात. परंतु त्यांना तपासण्यासाठी फक्त एकच डॉक्टर येथे आहे. यामुळे रूग्णांची तपासणी करताना त्यांची दमछाक होते. यामुळे त्यांना इतर सरकारी कामे करण्यास तसेच निरीक्षणांसाठी वेळ मिळत नाही. या रूग्णालयात परिचारिकाही कमी आहेत.

सध्या या रूग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे ठिकठिकाणी विजेच्या वायरी लटकलेल्या अवस्थेत आहेत.याचप्रमाणे मुख्य प्रवेश द्वाराजवळ मोठ्या प्रमाणावर गोण्यांमध्ये डेब्रिज भरु न ठेवले आहे. या रूग्णालयाच्या मागून वाहत असलेल्या गटारामधील दुर्गंधी मुळे रूग्ण तसेच डॉक्टरही त्रस्त आहेत. परंतु त्यांना तपासण्यासाठी फक्त एकच डॉक्टर येथे आहे.

यामुळे रूग्णांची तपासणी करताना त्यांची दमछाक होते. यामुळे त्यांना इतर सरकारी कामे करण्यास तसेच निरीक्षणांसाठी वेळ मिळत नाही. या रूग्णालयात परिचारिकाही कमी आहेत. सध्या या रूग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे ठिकठिकाणी विजेच्या वायरी लटकलेल्या अवस्थेत आहेत.
मुख्य प्रवेश द्वाराजवळ मोठ्या प्रमाणावर गोण्यांमध्ये डेब्रिज भरु न ठेवले आहे. या रूग्णालयाच्या मागून वाहत असलेल्या गटारामधील दुर्गंधीमुळे रूग्ण तसेच डॉक्टरही त्रस्त आहेत. येथे फक्त साधी प्रसूती केली जाते. सिझेरिअनसाठी कळव्यातील रूग्णालयात पाठवले जाते.

मनुष्यबळ वाढविण्याची गरज
वाढत्या रूग्णांच्या तुलनेत डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची संख्या मात्र कमी आहे. ती वाढविण्यासाठी त्या संदर्भातील आकृतीबंध प्रस्ताव प्रस्तावित आहेत. मात्र, मनुष्यबळ अपुरे असल्याने काही कंत्राटी पद्धतीनेही भरती केली आहे. तरीसुद्धा येथे मनुष्यबळाची गरज असल्याचे रुग्ण प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: The last element to measure the health system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य