मागील पाच वर्षे उद्योजकांसाठी पूरक तर शेतकऱ्यांसाठी ठरली मारक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 05:00 AM2019-04-05T05:00:02+5:302019-04-05T05:00:33+5:30
शेतकऱ्यांच्या मनात आहे तरी काय? । कोणता मुद्दा आहे महत्त्वाचा? । ‘लोकमत’चे बांधावरून रिपोर्टिंग
उद्योजकांना सवलती, कृषी योजनांना कात्री
मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात उद्योजकांवर सवलतीचा पाऊस पाडला, मात्र कृषी क्षेत्रात आणि शेतकरी यांना वाºयावर सोडले आहे. उद्योजकांना कोट्यावधींचे कर्ज माफ केले जात आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परत फेडीसाठी बँका, विविध सहकारी सोसायटी तगादा लाऊन मानसिक त्रास देतात. त्यामुळे आधीच कर्जबाजारी झालेला शेतकरी कुटुंबांची परिस्थिती बिकट झाली आहे. सरकारने कृषी व शेतकºयांना न्याय दिला पाहिजे. शेतकºयाला आर्थिक संकटातून बाहेर काढले पाहिजे.
- बाळू चौधरी, कोशिंबे, भिवंडी
कृषी विभागाच्या योजनांचा लाभ
सरकारच्या विविध योजनांचा लाभ शेतकºयांसह सर्वसामान्य नागरिकांना मिळाला आहे. मुद्रा योजना, विमा कृषी, रोजगार निर्मिती, रोजगार हमी योजना, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रश्न, सिंचन योजनांचा लाभ नागरिकांनी घेतला आहे. शिक्षणाकरिता अधिक तुकड्यांना शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे येथील सर्वसामान्य माणसेही समाधानी आहेत. शेतकºयांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ काही प्रमाणात मिळाला आहे. त्या मोठ्या प्रमाणात मिळणे आवश्यक आहे
- राजू चौधरी, मराडेपाडा, भिवंडी.
योजना सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे
केंद्र व राज्य सरकारने अनेक योजना आणल्या. मी माझ्या शेतावर सरकारी योजनेमधून विहीर खोदून कृषीपंप बसवला आहे. भातपिकासह भाजीपाला पिकवतो. गावातील नागरिकांना पाणी पुरवले जाते. वीटभट्टी व्यवसायही त्यावर सुरू आहे. भेंडी, गवार, ढोबळी मिरची या भाजीपाला पिकांसह झेंडू, मोगरा यांची लागवड केल्याने त्याचा फायदा मला झाला. सरकारच्या असलेल्या योजना सर्व शेतकºयांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. त्या पोहचल्या तरच शेतकरी खºया अर्थाने समाधानी होईल.
- महादू घोडविंदे, सूर्यानगर, भिवंडी
योजना राबविण्यात
मोदी सरकार अपयशी
देशातील जास्तीतजास्त नागरिक हे शेतीवर अवलंबून आहेत. मोदी सरकारने शेती व्यवसायासाठी पूरक योजना आणल्या नाहीत. ग्रामीण भागातील शेतकºयांचा फायदा होईल अशी कोणतीच योजना या सरकारने आणली नाही. शेतीमालाला हमीभाव देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. कर्जमाफीची योजना राबवली पण त्या योजनेची अंमलबजावणी पूर्ण झालेली नाही. मोठ्या योजनांमध्ये एका विशिष्ट वर्गाने भ्रष्टाचारी मार्गाने खूप पैसा कमवलाआहे. एकंदरीत पाच वर्षे मोठ्या उद्योजकांसाठी पूरक ठरली आहेत व शेतकºयांसाठी मारक. - सुरेश देसले, अवलोटे, भिवंडी
हमीभाव न मिळाल्याने शेतकरी नाराज
शेतमालाला योग्य हमी भाव मिळत नसल्याने तो नाराज आहे. शेतकºयांना लागणारी अवजारे, त्यासाठी असणाºया योजना या शेतकºयांपर्यंत पोहचायला हव्यात. मात्र अशा कोणत्याही योजना गरीब शेतकºयांपर्यंत पोहचतच नाहीत. भिवंडी तालुका कृषी कार्यालय व भिवंडी पंचायत समिती कृषी विभागाच्या योजना अधिकारी, पर्यवेक्षक धनदांडग्या शेतकºयांना लाभ देत असल्याने गरीब शेतकºयांना फायदा होत नाही. त्यामुळे आम्हा शेतकºयांना ही सवलत मिळत नाहीत. .
- महेंद्र भोईर, शेडगाव, भिवंडी