शेवटच्या महासभेत आभाराचेच दर्शन!

By admin | Published: June 20, 2017 06:28 AM2017-06-20T06:28:34+5:302017-06-20T06:28:34+5:30

मीरा-भार्इंदर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पार पडलेल्या महासभेत बहुतांश सदस्यांनी आभार मानत

The last general election is auspiciousness! | शेवटच्या महासभेत आभाराचेच दर्शन!

शेवटच्या महासभेत आभाराचेच दर्शन!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भार्इंदर : मीरा-भार्इंदर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पार पडलेल्या महासभेत बहुतांश सदस्यांनी आभार मानत आपल्या भावना व्यक्त केल्या. आमदार नरेंद्र मेहता आता नगरसेवकपदाची निवडणूक लढवणार नसल्याने ही त्यांची शेवटची महासभा ठरली. त्याबद्दल त्यांनीही मनोगत व्यक्त केले आणि त्यांची उणीव भासत राहणार असल्याच्या भावना महापौर गीत जैन यांनी व्यक्त केल्या.
आमदार, महापौरांसह आयुक्त डॉ. नरेश गीते, नगररचनाकार दिलीप घेवारे, नगरसेवक जुबेर इनामदार, प्रमोद सामंत, नगरसेविका नीलम
ढवण आदी १७ जणांनी सत्ताधारी पक्षांसह विरोधक व प्रशासनाचे आभार मानले. मेहता यांनी विरोधकांसह प्रशासन, स्वपक्षातील सदस्य व मित्रपक्ष शिवसेनेच्या कारभाराचे कौतुक करुन त्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. तसेच सर्वांची माफी मागितली.
यापुढील महासभेत राजकीय तसेच प्रशासकीय कामात अभ्यासू असलेले मेहता दिसणार नसल्याने त्यांची उणीव सभागृहात जाणवणार असल्याचे मत महापौरांनी व्यक्त केले.

शेवटच्या महासभेत प्रशासनाने सादर केलेल्या विविध विकासकामांच्या प्रस्तावावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. सत्ताधाऱ्यांच्या दबावापोटी हे प्रस्ताव आणल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस नगरसेवक जुबेर इनामदार व प्रमोद सामंत यांनी प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या पश्चिम महामार्गावरील लक्ष्मी पार्क व दारा ढाबादरम्यानच्या प्रस्तावित पादचारी पुलाच्या बांधकामाला आक्षेप घेतला. पुलाच्या बांधकामासाठी पालिकेने महामार्ग प्राधिकरणाची परवानगी घेतलेली नसतानाही मतदारांना अमिष दाखविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. बस आगारात कोणतीही सोय उपलब्ध नसताना तेथे डिझेल भरण्याच्या व्यवस्थेसाठी करण्यात आलेली वाढीव निधीची तरतूद बेकायदा असल्याचे मत त्यांनी मांडले. बस पार्किंगसाठी उत्तनच्या घनकचरा प्रकल्पाच्या जागेवर बांधण्यात आलेली पत्र्याची शेड सुका कचरा साठविण्यासाठी वापरली जात आहे. पार्किंगसाठी करण्यात आलेला खर्च वाया गेला असून शेडवरील पत्रेही वाऱ्याने उडून गेले आहेत. त्यामुळे शेडमधील कचरा ओला होत असल्याचे वास्तव सभागृहाच्या निदर्शनास आणले.

Web Title: The last general election is auspiciousness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.