२८,२९ ॲाक्टोबर रोजी यावर्षीचे अखेरचे खंडग्रास चंद्रग्रहण

By प्रज्ञा म्हात्रे | Published: October 7, 2023 01:28 PM2023-10-07T13:28:48+5:302023-10-07T13:29:08+5:30

जेव्हा चंद्र पृथ्वीच्या दाट छाये भोवतालच्या विरळ छायेत येतो, तेव्हा ‘ छायाकल्प चंद्रग्रहण ‘ दिसते

Last lunar eclipse of this year on October 28, 29 | २८,२९ ॲाक्टोबर रोजी यावर्षीचे अखेरचे खंडग्रास चंद्रग्रहण

२८,२९ ॲाक्टोबर रोजी यावर्षीचे अखेरचे खंडग्रास चंद्रग्रहण

googlenewsNext

ठाणे: यावर्षीचे अखेरचे खंडग्रास चंद्रग्रहण शनिवार २८ व रविवार २९ ॲाक्टोबर रोजी आश्विन पौर्णिमेच्या उत्तर रात्री १-०५ ते २-२३ या वेळेत दिसणार आहे अशी माहिती ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा कृ. सोमण यांनी दिली. 

३१ डिसेंबर २०२८ ची वर्ष अखेरची आणि नवीन वर्षाच्या स्वागताची रात्री नवीन वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात आकाशात ' खग्रास चंद्रग्रहण ' दिसणार आहे असेही सोमण म्हणाले.

दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील १० वर्षातील चंद्रग्रहणे !
जेव्हा चंद्र पृथ्वीच्या दाट छाये भोवतालच्या विरळ छायेत येतो, तेव्हा ‘ छायाकल्प चंद्रग्रहण ‘ दिसते. जेव्हा चंद्राचा थोडा भाग पृथ्वीच्या दाट छायेमध्ये येतो, तेव्हा ‘ खंडग्रास चंद्रग्रहण ‘ दिसते. जेव्हा संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेमध्ये येते तेव्हा ‘ खग्रास चंद्रग्रहण ‘ दिसते.
(१) छायाकल्प चंद्रग्रहण - २५ मार्च २०२४- भारतातून दिसणार नाही.
(२) खंडग्रास चंद्रग्रहण - १८ सप्टेंबर २०२४- भारतातून दिसणार नाही.
(३) खग्रास चंद्रग्रहण - १४ मार्च २०२५- भारतातून दिसणार नाही.
(४) खग्रास चंद्रग्रहण - ७ सप्टेंबर २०२५ - भारतातून दिसेल.
(५) खग्रास चंद्रग्रहण - ३ मार्च २०२६ - भारतात ग्रहणातच चंद्र उगवेल.
(६) खंडग्रास चंद्रग्रहण - २८ ॲागस्ट २०२६ - भारतातून दिसणार नाही.
(७) छायाकल्प चंद्रग्रहण - २० फेब्रुवारी २०२७ - भारतातून दिसेल.
(८) छायाकल्प चंद्रग्रहण - १८ जुलै २०२७ - भारतातून दिसेल.
(९) छायाकल्प चंद्रग्रहण - १७ ॲागस्ट २०२७ - भारतातून दिसणार नाही.
(१०) खंडग्रास चंद्रग्रहण - १२ जानेवारी २०२८ - भारतातून दिसणार नाही.
(११) खंडग्रास चंद्रग्रहण - ६ जुलै २०२८ - भारतातून दिसेल.
(१२) खग्रास चंद्रग्रहण - ३१ डिसेंबर २०२८ - भारतातून दिसेल.
(१३) खग्रास चंद्रग्रहण - २८ जून २०२९ - भारतातून दिसणार नाही.
(१४) खग्रास चंद्रग्रहण - २० डिसेंबर २०२९ - भारतातून दिसेल.
(१५) खंडग्रास चंद्रग्रहण - १५ जून २०३० - भारतातून दिसेल.
(१६) छायाकल्प चंद्रग्रहण - ९ डिसेंबर २०३० - भारतातून दिसेल.
(१७) छायाकल्प चंद्रग्रहण - ७ मे २०३१ - भारतातून दिसणार नाही.
(१८) छायाकल्प चंद्रग्रहण - ५ जून २०३१ - भारतातून दिसणार नाही.
(१९) छायाकल्प चंद्रग्रहण - ३० ॲाक्टोबर २०३१ - भारतातून दिसणार नाही.
(२०) खग्रास चंद्रग्रहण - २५ एप्रिल २०३२ - भारतातून दिसेल.
(२१)खग्रास चंद्रग्रहण - १८ ॲाक्टोबर २०३२ - भारतातून दिसेल.
(२२) खग्रास चंद्रग्रहण - १४ एप्रिल २०३३ - भारतातून दिसेल.
(२३) खग्रास चंद्रग्रहण - ८ ॲाक्टोबर २०३३ - भारतातून दिसेल.

Web Title: Last lunar eclipse of this year on October 28, 29

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.