कै.संकेत देशपांडे करंडक-२०२० द्विपात्री स्पर्धा जल्लोषात : हर्षाली बारगुडे आणि रितेश पिटले प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 04:54 PM2020-01-28T16:54:24+5:302020-01-28T17:38:25+5:30

ठाण्यात कै.संकेत देशपांडे करंडक-२०२० द्विपात्री स्पर्धा जल्लोषात संपन्न झाली. 

Late Sankate Deshpande Trophy - 2 bipartisan championships: Harshali Bargude and Ritesh Pitale I | कै.संकेत देशपांडे करंडक-२०२० द्विपात्री स्पर्धा जल्लोषात : हर्षाली बारगुडे आणि रितेश पिटले प्रथम

कै.संकेत देशपांडे करंडक-२०२० द्विपात्री स्पर्धा जल्लोषात : हर्षाली बारगुडे आणि रितेश पिटले प्रथम

Next
ठळक मुद्देकै.संकेत देशपांडे करंडक-२०२० द्विपात्री स्पर्धा हर्षाली बारगुडे आणि रितेश पिटले प्रथमस्पर्धेला महाराष्ट्रभरातून १२० कलाकारांनी घेतला सहभाग

ठाणे : संकेत देशपांडे ह्या प्रामाणिक आणि अष्टपैलू रंगकर्मीच्या कामाचं अस्तित्व जपण्यासाठी आणि अनेक नवोदित आणि हौशी रंगकर्मीना त्याच्या कार्याने प्रेरणा मिळावी ह्याच हेतूने अभिनय कट्ट्याचे संस्थापक  किरण नाकती ह्यांच्या संकल्पनेतून रोटरी क्लब ऑफ ठाणे व अभिनय कट्टा ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने कै संकेत देशपांडे करंडक २०२० या राज्यस्तरीय द्विपात्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत हर्षाली बारगुडे आणि रितेश पिटले(मुंबई) प्रथम क्रमांक पटकावला. 

        सदर स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी अभिनय कट्ट्याचे किरण नाकती, रोटरी क्लब ऑफ ठाणे चे अध्यक्ष अच्युत दामले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांभाळली. ही स्पर्धा सहयोग मंदिर येथे  घेण्यात आली आणि स्पर्धेला महाराष्ट्रभरातून १२० कलाकारांनी सहभाग घेतला.सदर स्पर्धेमध्ये रत्नागिरी, पुणे, सांगली,लातूर, कर्जत, टिटवाळा, आसनगाव, पनवेल, बदलापूर, डोंबिवली ,ठाणे, मुंबई व महाराष्ट्रातील विविध विभागातून स्पर्धक आले होते. वेगवेगळे विषय,भन्नाट सादरीकरण ह्या मुले स्पर्धा खूपच रंगतदार झाली.स्पर्धे मध्ये तरुण कलाकारांचा जोश तर होताच पण बालकलाकार आणि ज्येष्ठांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. सदर स्पर्धेचे परीक्षण लेखक डॉ.र.म.शेजवलकर, अभिनेता नितीन शहाणे, अभिनेत्री सुषमा रेगे ह्यांनी केले. सदर स्पर्धेत *हर्षाली बारगुडे आणि रितेश पिटले(मुंबई) प्रथम क्रमांक रोख रक्कम रुपये पंधरा हजार  , अक्षता साळवी,प्राची सोनावणे(कळवा)  ह्यांनी द्वितीय क्रमांक रोख रक्कम रुपये दहा हजार तर अवंतिका चौगुले, सुहास शिंदे(मुंबई) ह्यांनी तृतीय क्रमांकाचे रोख रक्कम रुपये पाच हजार व करंडक असे पारितोषिक पटकावले. तसेच निकेत हळवे आणि राहुल जगताप(भांडुप), गणेश कदम आणि अजय कुलकर्णी(नवी मुंबई), स्वप्नील धनावडे आणि तन्मय राऊत(रत्नागिरी),मानसी पवार आणि प्रगती नायकवडी(मुंबई), सागर पवार आणि आदर्श गायकवाड(पुणे) ह्यां जोडयाना प्रत्येकी उत्तेजनार्थ रुपये एक हजार व प्रमाणपत्र असे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.सादर स्पर्धेतून विशेष लक्षवेधी द्वीपात्री साठी संकेत देशपांडेंच्या कुटुंबियांकडून पारितोषिक देण्यात आले विशेष लक्षवेधी द्वीपत्रीचे पारितोषिक अभिषेक वेर्नेकर आणि सागर चौगुले(सांगली), विनोद आवळे  आणि विशाल वांगेकर( सांगली) ह्यांनी पटकाविले. सदर स्पर्धेला संकेत देशपांडे ह्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी तानाजी फेम ठाण्यातील अभिनेता धैर्यशील घोलप उपस्थित होता.प्रसंगी रोटरी क्लबचे विजय परांजपे, नयना महागावकर, अमोल काळे, अमिता दामले, मंदार जोशी तसेच अभिनय कट्ट्याचे परेश दळवी, अजित मापगावकर, कदिर शेख, आदित्य नाकती, चिन्मय मौर्ये, अद्वैत मापगावकर, विनायक करडे, अरविंद पाळंबे, संदीप पाटील, सहदेव साळकर, कल्पेश डुकरे अथर्व नाकती व इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते. संकेत देशपांडे एक गुणी अभ्यासू कलाकार त्याला अभिनय करताना पाहणे अनुभवने खरच सुंदर. एक सच्चा रंगकर्मी आपल्यात नाही आहे .ही द्विपात्री स्पर्धा म्हणजे त्याच्या कर्तुत्वाला आदरांजलीच जणू ह्या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून येणं त्या आदरांजलीत माझा थोडासा सहभाग असे मत अभिनेता धैर्यशील घोलप ह्याने व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ ठाणे आणि संकेत देशपांडे हे नातं हे नाटकामुळेच जुळलं. संकेत ने लिहलेल्या 'बाप गेला रे बाप' ह्या विनोदी नाटकानेच आम्हा रोटरीच्या सदस्यांना नाटकाच्या प्रेमात पाडलं.त्यानंतर त्यानेच लिहलेला गोलमाल रिटर्न ह्या हिंदी नाटकही आम्ही केले.आमच्यातील कलाकार ओळखायला जसे किरण नाकती ह्यांचे दिग्दर्शन कारणीभूत आहे तितकेच संकेतचे लिखाणही म्हणूनच रोटरी क्लब ऑफ ठाणे ह्यांच्या कडून ही द्विपात्री स्पर्धेतून संकेतच्या कर्तुत्वाला  सलाम असे मत रोटरीचे अध्यक्ष अच्युत दामले ह्यांनी व्यक्त केले. संकेत म्हणजे अभिनय कट्ट्याचा एक गुणी कलाकार.रंगमंचावर अचूक टायमिंग असणाऱ्या ह्या माणसाचं एक्झिटच टायमिंग परमेश्वराने मात्र चुकवले.एक अष्टपैलू आणि अभ्यासू कलाकार त्याच्या जाण्याने ही कलासृष्टी एक उत्कृष्ट रंगकर्मीच्या मुकली.माझा संकेत वेगळा होता पण त्यांच्यासारखेच महाराष्ट्रातील अनेक संकेत आहेत त्यांच्या साठी संकेतच्या नावाने ही स्पर्धा आयोजित केली त्यासाठी रोटरी क्लब ऑफ ठाणे चे विशेष सहाय्य मिळाले.ही स्पर्धा अशीच चालत राहणार ह्या स्पर्धेतूनच आमच्या संकेत ला आम्ही वेगवेगळ्या रुपात अनुभवु शकू असे मत अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ ठाणे व अभिनय कट्टा,ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने कै संकेत देशपांडे २०२० या राज्यस्तरीय द्विपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

Web Title: Late Sankate Deshpande Trophy - 2 bipartisan championships: Harshali Bargude and Ritesh Pitale I

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.