‘गीव्ह वे टू ॲम्ब्युलन्स’चा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:36 AM2021-08-01T04:36:47+5:302021-08-01T04:36:47+5:30
ठाणे : कोरोनाकाळात रुग्णवाहिकांचा वापर अधिक प्रमाणात होत आहे. आरोग्य आणीबाणीच्या कालावधीत अशी वाहने जीवनदूताचे काम करीत आहेत. ठाणे ...
ठाणे : कोरोनाकाळात रुग्णवाहिकांचा वापर अधिक प्रमाणात होत आहे. आरोग्य आणीबाणीच्या कालावधीत अशी वाहने जीवनदूताचे काम करीत आहेत. ठाणे शहर वाहतूक पोलीस व राधे फाउंडेशनतर्फे ‘गीव्ह वे टू ॲम्ब्युलन्स’ या अभियानाचा शुक्रवारी प्रारंभ करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, कार्यालय येथे ठाणे आयुक्तालय हद्दीतील रुग्णवाहिका मालकांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या समजून घेण्यात आल्या. तसेच ‘गीव्ह वे टू ॲम्ब्युलन्स’ या अभियानात सहभागी होण्याबाबत आवाहन करण्यात आले. तसेच भविष्यात रुग्णवाहिका चालक प्रशिक्षण भरवण्याबाबत सूतोवाच करण्यात आले. यावेळी राधे फाउंडेशनच्या डॉ. रिटा सावला उपस्थित होत्या. वाहतुकीच्या वेळी अशा रुग्णवाहिकांना वेगवान व सुकर प्रवासासाठी नागरिकांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
-------------