ठाणे भारत सहकारी बँकेच्या मोबाईल सेवेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 11:36 PM2018-03-30T23:36:59+5:302018-03-30T23:36:59+5:30

ग्रामीण भागातील जनतेला बचत आणि कर्ज योजनांचा लाभ होण्यासाठी ठाणे भारत सहकारी बँकेने मोबाईल व्हॅन बँकींग सेवा सुरु केली आहे. कर्जत आणि पालघर नजीकच्या गावांमध्येही अशी सेवा लवकरच सुरु होणार आहे.

Launch of Mobile Service of Thane Bharat Cooperative Bank | ठाणे भारत सहकारी बँकेच्या मोबाईल सेवेचा शुभारंभ

ग्रामीण भागातील जनतेला होणार लाभ

Next
ठळक मुद्दे ठाकूर्ली आणि चाकण शाखांचेही उद्घाटनशाखांची संख्या आता २९ वर पोहचलीग्रामीण भागातील जनतेला होणार लाभ

ठाणे: आपल्या ग्राहकांना जलदगती सेवा देण्यासाठी ठाणे भारत सहकारी बँकेने फिरत्या अर्थात मोबाईल बँकींगची नविन सेवा सुरु केली आहे. बँकेच्या ठाकूर्ली आणि चाकण शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ही माहिती देण्यात आली.
बँकेच्या २८ व्या ठाकूर्ली शाखेचे उद्घाटन संचालक डॉ. रविंद्र रणदिवे यांच्या हस्ते तर २९ व्या महाळूंगे चाकण शाखेचे उद्घाटन बँकेचे उपाध्यक्ष उत्तम जोशी यांच्या हस्ते २५ मार्च रोजी पार पडले. नविन दोन शाखांमुळे बँकेच्या शाखांची संख्या आता २९ वर पोहचली आहे. ग्रामीण भागातील घटकांना अपेक्षित अशी व्यक्तीगत सेवा आणि संगणकीय अत्याधुनिक सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी बँकेने मोबाईल व्हॅन बँकींग सेवा कार्यान्वित केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेने या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मा. य. गोखले यांनी केले आहे. ग्रामीण भागातील जनतेला बचत आणि कर्ज योजनांचा लाभ सुलभपणे होण्यासाठी बँकेने मोबाईल व्हॅन बँकींग सेवा सुरु केली आहे. सुरुवातीला ठाणे जिल्हयातील शहापूर येथील गावांमध्ये या सेवेचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे. त्यानंतर अशा प्रकारची सेवा कर्जत आणि पालघर नजीकच्या गावांमध्येही देण्याचा मानस असल्याचे गोखले यांनी सांगितले.

Web Title: Launch of Mobile Service of Thane Bharat Cooperative Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.