ठाण्यात पहिले खासगी लसीकरण केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:30 AM2021-06-04T04:30:44+5:302021-06-04T04:30:44+5:30

ठाणे : मागील काही दिवसांपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र वाढविण्यावरून आणि खासगी लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या मुद्द्यावरून चर्चा सुरू ...

Launches first private vaccination center in Thane | ठाण्यात पहिले खासगी लसीकरण केंद्र सुरू

ठाण्यात पहिले खासगी लसीकरण केंद्र सुरू

Next

ठाणे : मागील काही दिवसांपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र वाढविण्यावरून आणि खासगी लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या मुद्द्यावरून चर्चा सुरू होती. मात्र, आता ठाण्यात पहिले खासगी लसीकरण केंद्र घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट येथे सुरू झाले आहे. तेथे पहिल्याच दिवशी १०० जणांचे लसीकरण करण्यात आले. दुसरीकडे ठामपाने अशाप्रकारे शहरातील १०२ खासगी रुग्णालये आणि इतरांना लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली असल्याची माहिती उघडकीस आली आहे.

जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात झाली. परंतु, अनंत अडचणींचा सामना करत हे लसीकरण सुरू आहे. त्यानंतर आता ठामपाने खासगी रुग्णालये, गृहसंकुले, उद्योग आदी ठिकाणी लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी धोरण आखले होते. त्याअंतर्गत आतापर्यंत ठामपणे १०२ खासगी रुग्णालये आणि इतर आस्थापनांना लसीकरणाची परवानगी दिली असल्याची माहिती ठामपाने दिली आहे. त्यानुसार ठाण्यातील घोडबंदर भागातील हिरानंदानी इस्टेट या गृहसंकुलात अर्पण फाउंडेशनतर्फे पहिले खासगी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी खासगी रुग्णालयाची मदत घेतली आल्याची माहिती फाउंडेशनच्या प्रमुख भावना डुंबरे यांनी दिली.

दरम्यान, या केंद्रावर पहिल्याच दिवशी १०० जणांचे लसीकरण करण्यात आले. तेथे लस घेणाऱ्यांसाठी एक हजार रुपये मोजावे लागत आहेत. दुसरीकडे या किमतीवरून भविष्यात वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. खासगी रुग्णालयांना लसींच्या किमती ठरविण्याचे अधिकार दिले आहेत. परंतु, हे दर सर्व खासगी रुग्णालयांमध्ये एकच असावेत, अशी मागणी आता नागरिक करीत आहेत. काही ठिकाणी कोविशिल्डच्या एका डोसचे दर ७५० तर कुठे ८५०, तर कुठे ९०० रुपये आकारले जात आहेत. परंतु, आता हे दर समान ठेवावेत, अशी मागणी होत आहे.

लसीकरणाचा वेग वाढेल

ठाण्यात खासगी केंद्रावर लसीकरणास सुरुवात झाल्यामुळे ठामपाच्या केंद्रावर होणारी गर्दीही कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच लसीकरण मोहिमेचा वेग वाढून ही मोहीम वेळेत पूर्ण होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

------------

Web Title: Launches first private vaccination center in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.