नातू झाला तरी सासरी छळ सुरूच; नातवानेच फोडली आजीच्या छळाला वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:52 AM2021-06-16T04:52:28+5:302021-06-16T04:52:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे: नातू झाला तरी सासरी छळ होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. अगदी अलीकडे केवळ पाणी भरण्याच्या वादावरून ...

In-laws continue to persecute grandsons; Read the persecution of the grandmother who broke the grandson | नातू झाला तरी सासरी छळ सुरूच; नातवानेच फोडली आजीच्या छळाला वाचा

नातू झाला तरी सासरी छळ सुरूच; नातवानेच फोडली आजीच्या छळाला वाचा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: नातू झाला तरी सासरी छळ होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. अगदी अलीकडे केवळ पाणी भरण्याच्या वादावरून वयोवृद्ध पत्नीला अमानूषपणे मारहाण करणाऱ्या कथित ह. भ. प. गजाननबुवा चिकणकरला हिललाईन पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे त्याच्या अघोरी कृत्याचा व्हिडिओ नातवानेच काढून तो व्हायरल केल्यामुळे हा प्रकार समोर आला होता. ठाणे शहर आयुक्तालय क्षेत्रात गेल्या दीड वर्षात कौटुंबीक हिंसाचाराच्या ४६९, तर ठाणे ग्रामीणमध्ये ३२ तक्रारी दाखल झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

कल्याण तालुक्यातील मलंगपट्टयातील द्वारली गावातील चिकणकर या बुवाची पत्नीसह कुटुंबातील सर्वांवर चांगलीच दहशत आहे. तो आपल्या पत्नीला क्षुल्लक कारणावरून नेहमीच मारहाण करायचा. एक आठवडयापूर्वीही त्याने ८३ वर्षीय पत्नीला अशीच बेदम मारहाण केली. त्याचे चित्रण नऊ वर्षांच्या नातवाने मोबाईलमध्ये करून ते व्हायरल केले. या प्रकाराने संताप व्यक्त होताच तो आळंदीला पसार झाला. त्यानंतर हिललाईन पोलिसांनी त्याला आळंदी येथून अटक केली. विशेष म्हणजे त्याला ताब्यात घेतल्यानंतरही आपल्या ८५ वर्षीय पतीविरूद्ध या वृद्धेने तक्रार दिली नव्हती. अशाच प्रकारे अनेक महिला या कौटुंबीक हिंसाचाराला बळी पडतात. त्यांनी तक्रारीसाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे.

* नॅशनल क्राईम रिपोर्टनुसार विवाहानंतर महिलांवर हिंसाचार केल्याच्या तक्रारींचे राष्ट्रीय प्रमाण २८.९ टक्के इतके आहे. आपल्या राज्यात हे प्रमाण २१.४ टक्के इतके आहे. ठाणे जिल्ह्यात हे प्रमाण १२ ते १५ टक्के इतके आहे. लग्नानंतर २३ ते ३५ वयोगटातील महिला सासरी हिंसाचाराच्या बळी ठरतात. यामध्ये ग्रामीण १० टक्के, तर शहरी १८ टक्के इतके हे प्रमाण आहे.

........................................

* २०२० मध्ये जिल्ह्यात कलम ४९८ अंतर्गत दाखल गुन्हे -

शहरी भागात किती - २७९

ग्रामीण भागात किती - ४५

*२०२१ (मेपर्यंत) जिल्ह्यात कलम ४९८ अंतर्गत दाखल गुन्हे -

शहरी भागात किती - २२२

ग्रामीण भागात किती - २०

* पन्नाशी ओलांडली तरी छळ सुरूच

कल्याणमध्ये तर वयाचे पाऊण शतक पार केलेल्या महिलेला पतीने मारहाणीचा प्रकार समोर आला. असाच प्रकार अगदी पन्नाशी ओलांडलेल्या महिलांनाही सासरी कधी हुंडयासाठी, तर कधी चारित्र्याच्या संशयावरून मारहाण केली होती. ठाणे शहर आयुक्तालयात ४९८ - अ (छळामुळे मृत्यू) अंतर्गत २०२० मध्ये दहा, तर २०२१मध्ये एक गुन्हा दाखल झाला. ठाणे ग्रामीणमध्ये दीड वर्षात अशा ५८ तक्रारी दाखल आहेत. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या (कलम ४९८ सह ३०६) ठाणे शहरमध्ये २१ आणि ग्रामीणमध्ये पाच तक्रारींची नोंद आहे. केवळ शारीरिक, मानसिक छळवणुकीच्या (४९८) ठाणे शहरमध्ये ४६९, तर ग्रामीणमध्ये दोन तक्रारींची नोंद आहे.

‘‘महिलांनी कोणत्याही प्रकारच्या कौटुंबीक हिंसाचाराला बळी न पडता त्याची तक्रार पोलीस ठाण्यात करणे आवश्यक आहे. एखादा गुन्हा प्राथमिक अवस्थेत असेल त्याचवेळी त्यावर बैठक घेऊन नियंत्रण आणणे गरजेचे आहे. तरीही त्यावर नियंत्रण येत नसेल तर अशा वेळी कायद्याचा बडगा उगारणे आवश्यक आहे.’’

एक सामाजिक कार्यकर्ती, ठाणे.

................................

‘‘महिला आता सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. असे असूनही जर पतीकडून किंवा सासरच्या मंडळींकडून विवाहितेला मानसिक आणि शारीरिक त्रास होत असेल किंवा हुंडयासाठी छळ होत असेल तर याबाबत पोलीस ठाण्यात त्याची तक्रार करणे अपेक्षित आहे. सर्वच तक्रारींनी लगेच संसार उद्ध्वस्त होत नाहीत. संसार मोडू नये, यासाठी या तक्रारी केल्या जात नाहीत. परंतु, तक्रार केलीच नाही तर यातून मोठी दुर्घटना होण्याचीही भीती असते.

एक सामाजिक कार्यकर्ती, ठाणे.

.......................

Web Title: In-laws continue to persecute grandsons; Read the persecution of the grandmother who broke the grandson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.