भिवंडीत वकिलांचे जनआंदोलन; भिवंडी न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू करण्याची मागणी 

By नितीन पंडित | Published: February 7, 2023 05:42 PM2023-02-07T17:42:45+5:302023-02-07T17:43:04+5:30

या आंदोलनात शहरातील नागरिक व वकील मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती समितीचे निमंत्रक अॅड. किरण चन्ने यांनी दिली आहे.

Lawyers' Mass Movement in Bhiwandi; Demand to start additional district and session court in Bhiwandi court | भिवंडीत वकिलांचे जनआंदोलन; भिवंडी न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू करण्याची मागणी 

भिवंडीत वकिलांचे जनआंदोलन; भिवंडी न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू करण्याची मागणी 

googlenewsNext

भिवंडी :  राज्य शासनाने अर्थसंकल्पात भिवंडी न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच पूर्णवेळ उच्च स्तर दिवाणी न्यायालय व इतर आवश्यक न्यायालये स्थापन करण्याची तरतूद करावी या मागणीसाठी सत्र न्यायालय स्थापना मागणी अभियोक्ता व जनआंदोलन समितीच्यावतीने बुधवारी सकाळी साडे अकरा ते दोन या वेळेत भिवंडी प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 

या आंदोलनात शहरातील नागरिक व वकील मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती समितीचे निमंत्रक अॅड. किरण चन्ने यांनी दिली आहे. भिवंडी न्यायालयाच्या भव्य इमारतीचे उद्घाटन सरन्यायाधीश अभय ओक यांच्या शुभहस्ते पार पडले आहे. भिवंडी न्यायालयाची इमारत सुंदर व भव्य बांधण्यात आली आहे. मात्र या न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच पूर्णवेळ उच्च स्तर दिवाणी न्यायालय व इतर आवश्यक न्यायालय नसल्याने न्याय मिळविण्यासाठी वकील, पोलीस, पक्षकार व आरोपींना ठाणे येथे जिल्हा सत्र न्यायालयात जावे लागते. ठाणे येथील प्रवास किचकट व खर्चिक तसेच वाहतूक कोंडीचा असल्याने ठाणे प्रवासात आरोपी, त्यांचे नातेवाईक, वकील,पोलीस व सामान्य नागरिकांना वेळ व अतिरिक्त पैसे खर्च करावे लागत असून शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लावत आहे. 

विशेष म्हणजे नागरिकांची हि अडचण लक्षात घेता हि न्यायालये स्थापन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे.मात्र राज्य शासनाने अर्थ संकल्पात खर्चाची तरतूद न केल्याने भिवंडीत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना होऊन शकली नाही. त्यामुळे भिवंडीतील नागरिकांना न्यायासाठी ठाण्याला हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यातच भिवंडी परिसरात तीन विधी महाविद्यालय निर्माण झाल्याने दरवर्षी नवीन वकील भिवंडी न्यायालयात व्यवसायासाठी येत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने अर्थसंकल्पात भिवंडी न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच पूर्णवेळ उच्च स्तर दिवाणी न्यायालय व इतर आवश्यक न्यायालये स्थापन करण्याची तरतूद करावी या मागणीसाठी सत्र न्यायालय स्थापना मागणी अभियोक्ता व जनआंदोलन समितीच्या वतीने बुधवारी भिवंडी प्रांत कार्यालयासमोर सकाळी साडे अकरा ते दोन वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलन समितीचे निमंत्रक अॅड. किरण चन्ने यांनी सांगितले.
 

Web Title: Lawyers' Mass Movement in Bhiwandi; Demand to start additional district and session court in Bhiwandi court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.