‘सूर्या’च्या पाण्यासाठी नेते एकवटले
By Admin | Published: April 14, 2017 03:04 AM2017-04-14T03:04:06+5:302017-04-14T03:04:06+5:30
सूर्या प्रकल्पाचे पाणी प्रकल्प क्षेत्रा बाहेर वळविल्याने शेतकरी व भूमीपुत्रावर झालेला अन्याय दूर करण्याचा दृष्टीने आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पालघर, डहाणू, विक्र मगड
पालघर : सूर्या प्रकल्पाचे पाणी प्रकल्प क्षेत्रा बाहेर वळविल्याने शेतकरी व भूमीपुत्रावर झालेला अन्याय दूर करण्याचा दृष्टीने आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पालघर, डहाणू, विक्र मगड, तालुक्यातील सभापती, नगराध्यक्ष, जिप सदस्य, प.स सदस्य, सरपंच आदींची सभा सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीने १७ एप्रिल रोजी दादोबा ठाकूर सभागृहात आयोजित केली आहे.
सूर्या प्रकल्पांतर्गत धामणी, कावडास धरणाच्या एकूण २९९.०१ पाणी साठ्या पैकी १८२.८३ दलघमी इतके पाणी वसई-विरार व मिरा-भार्इंदर तसेच मुंबई प्राधिकरना कडे वळविण्यात आले आहे. हा प्रकल्प शेतीच्या सिंचनासाठी उभारण्यात आला व यासाठी हजारो कोटींचा खर्च आजवर करण्यात आला आहे. मात्र , २९९.०१ दलघमी पाणी साठ्यापैकी आजवर २२६.९३ दलघमी इतके पाणी बिगर सिंचनासाठी आरक्षित करण्यात आले असून यातील १८२.८३ दलघमी इतके पाणी वसई-विरार, मिरा-भार्इंदर साठी आरक्षित करण्यात आले आहे.
वसईला आधी तात्पुरत्या स्वरूपात सन २००७ पर्यंत हे पाणी देण्यात आले होते. वर्ष २००७ नंतर वसई-विरार महानगर पालिका स्वत:च्या पाण्यासाठीचे स्तोत्र निर्माण करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, नागरीकरणाच्या रेट्यात माठ्या प्रमाणात इमारती उभ्या राहू लागल्याने वसईकरांची पाण्याची हाव वाढत गेली आणि राजकीय डाव खेळत त्यांनी अधिक पाणी पळविल्याचे सूर्य बचाव संघर्ष समितीचे म्हणणे आहे. त्यातच हे पाणी पुढे मिरा-भार्इंदरला देऊन इथल्या नागरिकांना मात्र शासनाने तहानलेले ठेवले आहे.
सूर्या प्रकल्पाचे पाणी प्रकल्प क्षेत्राबाहेर वळविल्याने प्रकल्प क्षेत्रातील आदिवासी व शेतकऱ्यासमोर मोठे प्रकल्प उभे राहणार असून पालघर ग्रामीण जिल्ह्याच्या विकासावर यापुढे मोठे प्रश्न चिन्ह निर्माण होणार आहे. या पाशर््व भूमीवर ह्या अन्याया विरु द्ध आवाज उठविणे गरजेचे असून ह्या संबंधातील सत्य समजून घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली आहे. ह्यावेळी खासदार चिंतामण वणगा, आमदार अमित घोडा, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, आमदार पास्कल धनारे, आनंद ठाकूर ई. मान्यवर मार्गदर्शन करणार असल्याचे सूर्य पाणी बचाव संघर्ष समितीने कळविले आहे.
वरील तालुक्यांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने सर्वच पक्षाचे नेते व पदाधिकारी आपले राजकिय हेवेदावे विसरुन एकत्र येण्याने ठरवले आहे. तसचे ग्रामिण भागाचे त्याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
१९ हजार एकर शेतीला पाणी मिळणार नाही
सूर्या प्रकल्पाचे पाणी प्रकल्प क्षेत्राबाहेर नेल्याने प्रकल्प क्षेत्रातील १९ हजार एकर शेतीला आता पाणी मिळणार नाही. इतकेच नव्हे तर प्रकल्प क्षेत्रातील तहानलेल्या गावांनाही या प्रकल्पातून या पुढे पाणी मिळणार नाही. या पुढे जाऊन जिल्हा मुख्यालय व प्रस्तावित सिडको, नवनगरसाठी पाणी कुठून उपलब्ध होणार हा देखील एक प्रश्न आहे.