महाप्रबोधन यात्रेत आक्षेपार्ह भाषण ठाकरे गटाच्या नेत्यांना नडले; नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By अजित मांडके | Published: October 11, 2022 09:46 PM2022-10-11T21:46:43+5:302022-10-11T21:47:49+5:30
ठाण्यात नौपाडा पोलीस ठाण्यात बाळा गवस यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे गटाकडून सध्या महाप्रबोधन यात्रा सुरू आहे.
ठाणे: महाप्रबोधन यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य आणि नक्कल केल्याप्रकरणी ठाण्यात ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे, अनिता बिर्जे, मधुकर देशमुख, धर्मराज्य पक्षाचे राजन राजे यांच्या विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यात नौपाडा पोलीस ठाण्यात बाळा गवस यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे गटाकडून सध्या महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. त्याची सुरुवात रविवारी ठाण्यातून करण्यात आली. यावेळी या मेळाव्याला विनायक राऊत,भास्कर जाधव, सुषमा अंधारे आदींसह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांच्याकडून झालेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य आणि नकल करणे अशा स्वरूपाची तक्रार करण्यात आली आहे अक्षय वारे वक्तव्यांमुळे शिंदे गटाने ठाकरे गटात तेढ निर्माण होईल असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारची ही तक्रार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.