ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत

By जितेंद्र कालेकर | Published: October 2, 2024 05:38 PM2024-10-02T17:38:32+5:302024-10-02T17:38:43+5:30

ही घटना बुधवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

Leakage in Mahanagar gas channel due to JCB shock in Thane, gas supply of 500 customers interrupted | ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत

ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत

ठाणे: कोपरी पूर्व भागात ठाणे महानगरपालिकेच्या वतीने एका खासगी ठेकेदाराच्या मदतीने ड्रेनेज लाईनचे काम सुरू असताना, जेसीबीचा धक्का लागल्याने महानगर गॅस पाईप लाईनमधून गळती होण्यास सुरुवात झाली. याचा फटका सुमारे ५०० ग्राहकांना बसला. 

ही घटना बुधवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या गळतीची माहिती मिळताच घटनास्थळी महानगर गॅस कर्मचाऱ्यांसह कोपरी पोलीस तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. यावेळी महानगर गॅस कर्मचाऱ्यांनी गॅस पाईपलाईनचा मुख्य वॉल्व बंद करून या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरु केले. 

याचदरम्यान दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत कोपरीतील सुमारे ५०० पेक्षा अधिक ग्राहकांचा गॅस पुरवठा बंद केला होता. काम पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ग्राहकांचा गॅस पुरवठा पूर्ववत केल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

Web Title: Leakage in Mahanagar gas channel due to JCB shock in Thane, gas supply of 500 customers interrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे