टाेकावडे ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:46 AM2021-09-23T04:46:32+5:302021-09-23T04:46:32+5:30
मुरबाड : काेट्यवधी रुपये खर्चून सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या टोकावडे ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीला सहा वर्षांतच गळती लागली आहे. पुरुष ...
मुरबाड : काेट्यवधी रुपये खर्चून सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या टोकावडे ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीला सहा वर्षांतच गळती लागली आहे. पुरुष वाॅर्ड, महिला वाॅर्डसह सर्वत्र ठिबक सिंचन सुरू झाल्याने रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कर्मचाऱ्यांसाठी अडीच कोटी खर्चून बांधलेली इमारत कर्मचाऱ्यांनी घरट्याची वाट धरल्याने ती ओस पडली आहे.
कल्याण - नगर राष्ट्रीय महामार्गावर टोकावडे मध्यवर्ती ठिकाण आहे. माळशेजघाट याच मार्गावर येत असून, या घाटात सततच्या अपघातातील जखमींवर टोकावडे ग्रामीण रुग्णालयात तत्काळ उपचार होत असतात. तसेच, ८०-९० गावांतील जनता उपचारासाठी येत असते. दररोज दोन - अडीचशे बाह्यरुग्ण तपासणीची क्षमता या रुग्णालयाची आहे. मात्र, निकृष्ट बांधकामामुळे इमारतीचे ठिबक सिंचन सुरू झाले आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल हाेत आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासी इमारत बांधली आहे. दोन वर्षे झाली तरी येथे एकही अधिकारी वा कर्मचारी राहात नसल्याचे निदर्शनास आले आहे.
काेट
टोकावडे ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीची दाेन दिवसांत दुरुस्ती करून गळती थांबवली जाईल.
- एस. एम. कांबळे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम, मुरबाड.