ठाणे जिल्ह्यात डावे पक्ष सक्रीय; महसूल मंत्र्यांच्या घरावरील लाॅग मार्चची तयार!
By सुरेश लोखंडे | Published: April 18, 2023 06:54 PM2023-04-18T18:54:21+5:302023-04-18T18:55:40+5:30
मंत्रालयावर नाशिक येथून अलिकडेच काढण्यात आलेला किसान सभेच्या लाॅग मार्च एका कार्यकर्त्याच्या दुदैर्वी मृत्यूमुळे शहापूर येथे स्थगित करण्यात आला हाेता.
ठाणे : जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघत असतानाच सक्रीय राजकारणापासून दूर गेलेले सीपीएम, लालबावटा, लाल निशान आदी डाव्या विचारणीचे राजकीय पक्ष आता पुन्हा ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात सक्रीय हाेताना आढळून येत आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली या कार्यकर्त्यानी मुरबाड, शहापूर, भिवंडीसह पालघरच्या वाडा, जव्हार, माेखाडा, डहाणू तालुक्यात सभा, बैठका घेऊन आगामी निवडणुकांसाठी चाचपणी सुरू केली असून या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे २६ ते २८ एप्रिल दरम्यान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील घरावर शेतकऱ्यांच्या लॉंग मार्च काढण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा या कार्यकर्त्यांमध्ये आहे.
मंत्रालयावर नाशिक येथून अलिकडेच काढण्यात आलेला किसान सभेच्या लाॅग मार्च एका कार्यकर्त्याच्या दुदैर्वी मृत्यूमुळे शहापूर येथे स्थगित करण्यात आला हाेता. मात्र त्यानंतर आता पुन्हा महसूलमंत्र्यांच्या लाेणी येथील निवासस्थानी धडक देणार्या लाॅग मार्चची तयार ठाणे जिल्ह्यातील शेतकर्यांनी या किसान सभेच्या नेतृत्वाखाली सुरू केली आहे. अहमदनगरमधील अकोले ते लोणी हा पायी प्रवास करून शेतकरी विखेपाटील यांच्या निवासस्थानी धडकणार आहेत. या तयारीसाठी ठाणे जिल्ह्यात सभा, बैठका आणि मेळाव्याचे सत्र या कार्यकर्त्यां नी हाती घेतले आहे.
महात्मा फुले जयंती दिनी आणि किसान सभेच्या वर्धापन दिनी या कार्यकत्यार्ंनी प्रथमच मुरबाड तालुक्यातील दुर्गम गांवखेड्यात पाड्यावर या कार्यकत्यार्ंनी सभा, बैठका घेतल्या. ायाच दरम्यान शहापूर, वाडा, वसई व भिवंडी आदी सात तालुक्यातील दीड हजारांहून अधिक स्त्री-पुरुषांचा मेळावा घेतला. पक्ष साेडून गेलेले भिवंडीसह अन्य तालुक्यातील ५० हून अधिक प्रमुख कार्यकर्ते पुन्हा लाल बावट्याकडे परतले आहेत. या सभा,बैठकांम किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, किसन गुजर, किरण गहला, यशवंत बुधर, अमृत भावर, भरत वळंबा, चंद्रकांत घोरखाना, प्राची हातिवलेकर, रडका कलांगडा, लक्ष्मण डोंबरे, सुनील सुर्वे, नंदू हाडळ जेष्ठ उपस्थितांन मार्गदर्शन करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.