ठामपात वादग्रस्त फायलींना फुटले पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:27 AM2021-06-11T04:27:29+5:302021-06-11T04:27:29+5:30

ठाणे : शहर विकास विभागातील महत्त्वाच्या व वादग्रस्त प्रस्तावांबाबतच्या फायली बेकायदेशीर पद्धतीने कार्यालयाबाहेर नेल्या जात आहेत. एका अतिवरिष्ठ माजी ...

The legs of the controversial files burst | ठामपात वादग्रस्त फायलींना फुटले पाय

ठामपात वादग्रस्त फायलींना फुटले पाय

Next

ठाणे : शहर विकास विभागातील महत्त्वाच्या व वादग्रस्त प्रस्तावांबाबतच्या फायली बेकायदेशीर पद्धतीने कार्यालयाबाहेर नेल्या जात आहेत. एका अतिवरिष्ठ माजी अधिकाऱ्याकडून बॅकडेटेड मंजुरी दिली जात असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना पत्र पाठवून या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची मागणी बुधवारी त्यांनी केली.

महापालिकेचा शहर विकास विभाग नेहमी वादग्रस्त राहिला आहे. या विभागातील अनेक फायलींची मंत्रालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व सीआयडीकडून चौकशी सुरू असून, न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. यापूर्वी शहर विकास विभागात आग लागून वादग्रस्त फायली जळल्या जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर एक अतिवरिष्ठ अधिकारी बदलीपूर्व रजेवर गेल्यानंतर महापालिका मुख्यालयातून २००-३०० फायली एकत्रितपणे बाहेर नेल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेनंतर काही महिन्यांतच शहर विकास विभागात आग लागल्याची घटना घडली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

महापालिकेच्या एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे व वादग्रस्त प्रस्ताव तयार करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र, त्यावर त्या अधिकाऱ्याच्या स्वाक्षऱ्या झाल्या नव्हत्या. आता त्याच फायली मंजूर करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामागे काही ठरावीक अधिकारी व काही बिल्डरांचे संगनमत आहे. त्यांच्याकडून अनेक वादग्रस्त प्रकल्पांच्या फायली शहर विकास कार्यालयाबाहेर नेऊन त्यावर संबंधित अधिकाऱ्याच्या बॅकडेटेड स्वाक्षऱ्या केल्या जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. तसेच शहर विकास विभागातून बाहेर नेल्या जाणाऱ्या फायली व सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही माहिती घेतल्यास उलगडा होऊ शकेल. त्याचबरोबर या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून वादग्रस्त फायलींचा शोध घेण्याची मागणी पवार यांनी केली आहे.

Web Title: The legs of the controversial files burst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.