अंबरनाथ मध्ये बिबट्याने केली वासराची शिकार
By पंकज पाटील | Published: October 13, 2023 06:57 PM2023-10-13T18:57:28+5:302023-10-13T18:58:33+5:30
या बिबट्याचा वावर वसत आणि फॉरेस्ट नाका या परिसरातच असल्याचे समोर आले आहे.
पंकज पाटील, अंबरनाथ: अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावर बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर हा बिबट्या नेमका कुठे दृष्टिक्षेपात पडेल याची वन विभागाला देखील जाणीव नव्हती. अखेर या बिबट्याने वसत गावाजवळ एका वासराची शिकार केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या बिबट्याचा वावर वसत आणि फॉरेस्ट नाका या परिसरातच असल्याचे समोर आले आहे.
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाकावर रात्रीच्या सुमारास काही नागरिकांना जांभूळ गेस्ट हाऊस जवळ बिबट्या दिसला होता. लागलीच दोन दिवसानंतर या बिबट्याने वसत गावाजवळ एका वासराची शिकार केल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्याची माहिती ग्रामस्थांनी वन विभागाला दिली असून या बिबट्याला जेरबंद करून घनदाट जंगल मध्ये सोडाव्याशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याआधी देखील बदलापूर परिसरात बिबट्या नागरिकांच्या नजरेत पडला होता. मलंगगड, कुंडेश्वर, जांभूळ, वसत या भागामध्ये बिबट्याचा वावर सुरू असल्याचे समोर आले आहे.