VIDEO: घोडबंदर परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन, सार्वजनिक शौचालयाजवळ वावर; भीतीचं वातावरण
By धीरज परब | Published: August 30, 2022 11:15 AM2022-08-30T11:15:26+5:302022-08-30T11:16:38+5:30
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान लगत असलेल्या घोडबंदर गावात सार्वजनिक शौचालय जवळ सोमवारी पहाटे बिबट्याचे दर्शन घडल्याने परिसरात काहीसे भीतीचे वातावरण आहे.
मीरारोड ( ठाणे ) -
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान लगत असलेल्या घोडबंदर गावात सार्वजनिक शौचालय जवळ सोमवारी पहाटे बिबट्याचे दर्शन घडल्याने परिसरात काहीसे भीतीचे वातावरण आहे. तसे पाहता या भागात बिबट्यांचा वावर नवीन नसला तरी वन विभागाने लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
घोडबंदर गावा लगतच वन हद्द असून या भागातील वन हद्दीत तसेच लगतच्या प्रतिबंधात्मक क्षेत्रात अनेक बेकायदा बांधकामं व अतिक्रमण झालेली आहेत. घोडबंदर गाव व घोडबंदर किल्ला परिसरात बिबट्या वाघांचा वावर नवीन नाही. अनेकवेळा बिबट्या, बिबट्याची पिल्ले दिसून आली आहेत.
सोमवारी पहाटे घोडबंदरच्या बामणदेव मंदिर जवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर बिबट्या दिसून आला. त्यावेळी तेथे असलेल्या परिवहन सेवेतील बस वाहकाला बिबट्याचे दर्शन झाले असता त्याने चित्रीकरण केले. सदर सार्वजनिक शौचालयाचा वापर परिसरातील रहिवाशी पहाटे पासून रात्री पर्यंत करत असतात. बिबट्या मोठा असल्याने रहिवाश्यां मध्ये भीतीचे वातावरण आहे.
VIDEO: घोडबंदर परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण pic.twitter.com/3KI2jybzpr
— Lokmat (@lokmat) August 30, 2022
सदर बिबट्या वाघ हा पूर्णवाढ झालेला असून नर असावा असा अंदाज वन अधिकारी मनोज पाटील यांनी व्यक्त केला. वन विभागा मार्फत परिसरातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला असून जनजागृती केली जाणार आहे. काही दिवसां पूर्वी देखील परिसरात बिबट्या दिसून आला होता असे ते म्हणाले.