ठाण्यात बिबट्याचे दर्शन; भीमनगर परिसरात घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 11:24 AM2021-12-17T11:24:13+5:302021-12-17T11:24:26+5:30

त्या बिबट्याने कोणालाही दुखापत केलेली नाही. तरीसुद्धा त्या परिसरातील नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहे

Leopard sightings in Thane; Panic in Bhimnagar area | ठाण्यात बिबट्याचे दर्शन; भीमनगर परिसरात घबराट

ठाण्यात बिबट्याचे दर्शन; भीमनगर परिसरात घबराट

Next

ठाणे: वर्तकनगर पोखरण रोड नंबर १ येथील भीमनगर परिसरात गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तेथील काही नागरिकांना बिबट्या फिरत असल्याचे निर्दशनास आले. बिबट्याच्या या अचानक झालेल्या दर्शनामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते.

त्या बिबट्याने कोणालाही दुखापत केलेली नाही. तरीसुद्धा त्या परिसरातील नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहे. याची माहिती मिळताच वर्तकनगर पोलीस कर्मचारी, वनविभागाचे अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

Web Title: Leopard sightings in Thane; Panic in Bhimnagar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.