डोंबिवली पोलीसांनी घेतले संतुलित आहाराचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 05:37 PM2018-03-28T17:37:14+5:302018-03-28T17:37:14+5:30
आरोग्यावर बोलू काही या विषयावर डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याच्या जागेत पोलिसांचे आरोग्य विषयक दुर्लक्ष त्यासाठी त्यांनी घ्यायची काळजी या विषयावर ते मार्गदर्शन करत होते. रोटरी क्लब मिडटावून,डोंबिवली रामनगर पोलीस यांच्यातर्फे आरोग्या विषयी मार्गदर्शन शिबिर मंगळवारी आयोजित केले होते.
डोंबिवली- धावपळीच्या युगात आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी फार कमी वेळ दिला जातो, त्यात पोलीस यंत्रणेला कामाच्या विविध वेळेमध्ये आहाराचे नियंत्रण राखताना अनेक समस्या उधबवतात. त्यासाठी पोलिसांनी संतुलित आहार घ्यावा. तणाव कमी करण्यासाठी जर पोलीस व्यसन करत असतील तर ते योग्य नाही. त्याऐवजी सकस आहार घेतल्यास त्याचा फायदा नक्कीच चांगला होतो. तसेच दिवसाला निश्चित वेळी व्यायाम केल्यास त्याचे फायदे चिरकाल राहतील, असे आवाहन आयुर्वेद तज्ञ डॉ.मंगेश देशपांडे यांनी केले.
आरोग्यावर बोलू काही या विषयावर डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याच्या जागेत पोलिसांचे आरोग्य विषयक दुर्लक्ष त्यासाठी त्यांनी घ्यायची काळजी या विषयावर ते मार्गदर्शन करत होते. रोटरी क्लब मिडटावून,डोंबिवली रामनगर पोलीस यांच्यातर्फे आरोग्या विषयी मार्गदर्शन शिबिर मंगळवारी आयोजित केले होते.या शिबिरात कायदेतज्ज्ञ अँड.शिरीष देशपांडे, डॉ. देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.
ते म्हणाले की, ताणतणावामुळे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो तसेच प्रत्येक व्यक्ती ने सुखी जीवन जगायचे असेल तर आहार वेळेवर घेणे,नियमित व्यायाम, तेलकट व तिखट पदार्थ जास्त खाऊ नये,आरोग्य हिच आपली संपत्ती आहे. या कार्यक्रमाला रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजयसिंग पवार, यांच्यासह अधिकारी-कर्मचारी वर्ग, मिडटावून चे अध्यक्ष नितीन शेंबेकर, रोटेरिअन प्रकाश सिनकर,अँड.अनिलकुमार बाविस्कर, मिडटावून रोटरीयन सदस्य उपस्थित होते. शिबिराच्या शुभारंभाला वरिष्ठ पो.नि.विजयसिंग पवार यांनी पोलिस स्टेशनतर्फे मान्यवराचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन मिडटावूनचे अध्यक्ष नितीन शेंबेकर यांनी केले.