राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाकडे कार्यकर्त्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 03:21 AM2018-10-23T03:21:27+5:302018-10-23T03:21:31+5:30

जिल्हा कार्यकारीणीच्या नवीन नियुक्त्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक पातळीवर नाराजी पसरली असताना त्याचे सावट सोमवारच्या लोकसंवाद कार्यक्रमावरही होते.

Lessons of NCP workers' public dialogue program | राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाकडे कार्यकर्त्यांची पाठ

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाकडे कार्यकर्त्यांची पाठ

Next

डोंबिवली : जिल्हा कार्यकारीणीच्या नवीन नियुक्त्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक पातळीवर नाराजी पसरली असताना त्याचे सावट सोमवारच्या लोकसंवाद कार्यक्रमावरही होते. या प्रशिक्षण आणि मार्गदर्शन निमित्ताने घेतलेल्या कार्यक्रमाकडे तरुण कार्यकर्त्यांनी पाठ फिरविली तर हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी लावलेली उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. या एकूणच वातावरणाबाबत वक्त्यांनीही खडेबोल सुनावले.
डोंबिवलीतील केडीएमसीच्या विभागीय कार्यालयातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान हा कार्यक्रम झाला. जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून प्रदेश प्रवक्ते आणि लोकसंवादचे प्रदेश मुख्य समन्वयक विकास लवांडे, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे आणि पत्रकार विजय राऊत हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पक्षाचे डोंबिवली शहर विधानसभा क्षेत्र माजी उपाध्यक्ष प्रसन्न अचलकर यांनी केले होते. तरुण कार्यकर्ते व अचलकर यांच्या सहकाºयांनीही या कार्यक्रमाला नाराजीमुळे उपस्थित न राहणे पसंत केले.
जिल्हाध्यक्ष हनुमंते, सारीका गायकवाड, राजेश शिंदे, संदीप देसाई, मनोज नायर, उमेश बोरगावकर या आजी-माजी पदाधिकाºयांसह काही मोजक्याच मंडळींनी कार्यक्रमाला उपस्थित लावली होती.
सभागृहातील निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या होत्या. यावर सुटीच्या दिवशी कार्यक्रम नव्हता. त्यात पक्षामध्ये बहुतांश नोकरदार वर्ग आहे, त्यामुळे सर्वांनाच सोमवारच्या लोकसंवादाला उपस्थित राहता आले नाही, अशी सारवासारव उपस्थित पदाधिकाºयांनी केली.
दरम्यान, मतभेद असावेत, पण मनभेद असू नये, मन जुळली पाहिजेत, अन्यथा कितीही प्रशिक्षणे दिली तरी काही फायदा होणार नाही. पद आपल्याला मोठे करीत नाही तर आपल्या कामामुळे पद मोठे होते, असे काम करा की पक्षाकडून तुमची दखल घेतली गेली पाहिजे, नियुक्त्यांवर काही जण बोलणारच, पण एकमेकांचे पाय ओढू नका पक्षवाढीसाठी काम करा, अशा शब्दांत वक्ते विकास लवांडे यांनी खडेबोल उपस्थितांना सुनावले.
>भाजपा सरकारवर खरपूस टीका
भाजपाला संसदीय लोकशाही मान्य नाही, ते अध्यक्षीय लोकशाहीचे पुरस्कर्ते आहेत. ज्यांनी आयुष्यभर नथुराम गोडसेंची पूजा केली त्या भाजपाने गांधींना हायजॅक केले आहे, तर पंडित नेहरूंना खलनायक बनविले जात आहे. विकासाची कोणतेही मुद्दे दाखविता येत नसल्याने राममंदिराचा मुद्दा पुन्हा उचलण्यात आला आहे. हा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असताना याबाबत कायदा कसा होऊ शकतो, असा टोला या वेळी वक्ते विकास लवांडे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना लगावला.

Web Title: Lessons of NCP workers' public dialogue program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.