वृक्ष लागवडीच्या जन आंदोलनासाठी कोकणात वातावरण तापत ठेवण्याचे अधिकाऱ्यांना धडे

By सुरेश लोखंडे | Published: December 27, 2018 07:32 PM2018-12-27T19:32:38+5:302018-12-27T19:41:49+5:30

महसूल, सीडको, जेएनपीटी आदींच्या सुमारे २०० हेक्टरभूखंडावर कांदळवन लागवडीचे नियोजन आहे. त्यासाठी जमीन ताब्यात घेतली जात आहे. १३ कोटी लागवडीच्या कार्यक्रमावेळी सहा लाख कांदळवन लागवडीच उद्दीष्ठ असताना आठ लाख लागवड झाली. आताही २०० हेक्टरवरील लागवडीची तयार नोव्हेंबरमध्ये सुरू असल्याचे यावेळी नमुद करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभागाकडून सिंधुदूर्गमध्ये ६८ किमी. रस्त्यांच्या दुतर्फा, ४१ किमी. रेल्वे लाइन लागत, चार किमी.च्या कालव्याच्या दुतर्फा आदी सुमारे ३२४ किमी.च्या रस्त्यांसह जंगल क्षेत्रात वृक्ष लागवडीचे नियोजन केले

Lessons to the people to keep the environment in Konkan for mass movement of tree plantation | वृक्ष लागवडीच्या जन आंदोलनासाठी कोकणात वातावरण तापत ठेवण्याचे अधिकाऱ्यांना धडे

प्रशासनासह राजकीय, सामाजिक संघटना, शेतकरी आदीना वृक्ष लागवडीस प्रोत्साहन करण्यासाठी वन विभाग सचिव विकास खारगे यांनी अधिकाऱ्यांना येथील कोकण विभागीय आढावा बैठकीत गुरूवारी धडे दिले.

Next
ठळक मुद्देसुमारे ३३ कोटी वृक्ष यंदा लागण्याची शक्यताजि ल्ह्यांमधील कार्यक्रमांसाठी वन अधिकाऱ्यांनी अवर्जुन उपस्थिती लावावी आतापर्यंत लागवड केलेल्या वृक्षांचा पहाणी दौरे आयोजित करा,वृक्ष लागवडीचे आकडे केवळ कागदांवर असल्याचा संशय दूर करा

सुरेश लोखंडे
ठाणे : वृक्ष लागवडीसाठी जन आंदोलन तयार करण्यासाठी कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये आतापासून वातावरण निर्मिती तयार करा. विविध कार्यक्रम घेऊन वातारवण सतत तापत ठेवा. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी (सीईओ) आदींना तालुक्यांमध्ये ठिकठिकाणी बैठका घेण्यास भाग पाडून प्रशासनासह राजकीय, सामाजिक संघटना, शेतकरी आदीना वृक्ष लागवडीस प्रोत्साहन करण्यासाठी वन विभाग सचिव विकास खारगे यांनी अधिकाऱ्यांना येथील कोकण विभागीय आढावा बैठकीत गुरूवारी धडे दिले.
५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज कोकण विभागीय आढावा बैठक पार पडली. दोन सत्रातही बैठक पार पडली. यासाठी ठाणेसह मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आदी जिल्ह्यातील वन खात्यासह सामाजिक वनीकरण, कांदळवन विभाग आदींच्या अधिकाऱ्यांची कोकण विभागीय बैठक घेऊन खारगे यांनी वृक्ष लागवडीच्या कामाचा आढावा घेत अधिकाऱ्यांना लोकचळवळीसाठी धडे दिले. आतापर्यंत लागवड केलेल्या वृक्षांचा पहाणी दौरे आयोजित करा, रोपांची वाढ होत आहेत. झाडे जिवंत आहेत, त्यांची निगा राखली जात आहे, संगोपन करण्यासाठी अधिकारी सदैव सतर्क असल्याची जाणीव करून देण्यासाठी नागरिकांसह सामाजिक, शैक्षणिक, राजकीय संघटनांचे दौरे आयोजित करण्याची तंबी खारगे यांनी अधिकाऱ्यांना दिली.
वृक्ष लागवडीचे आकडे केवळ कागदांवर असल्याचा संशय दूर करा,वस्तुस्थिती दाखवण्यासाठी खासदार , आमदारांसमावेत नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करा,जि ल्ह्यांमधील कार्यक्रमांसाठी वन अधिकाऱ्यांनी अवर्जुन उपस्थिती लावावी. त्यातील भाषणामध्ये वृक्ष लागवडीचे महत्व पटवून देण्याची संधी मिळवण्यासाठी देखील त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. यावेळी कांदळवन लागवडीसह रस्त्यांच्या दुतर्फा, खाडी किनारी, मोकळ्या जागा, जंगल परिसरात वृक्ष लागवडीसाठी आधीच मनुष्यबळाचे नियोजन करा, त्यांची यादी तयार ठेवा, खड्डे खोदण्यासह रोपवाटीकांमध्ये मोठ्याप्रमाणात रोपे तयार ठेवा कोणात सुमारे ३३ कोटी वृक्ष यंदा लागण्याची शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
महसूल, सीडको, जेएनपीटी आदींच्या सुमारे २०० हेक्टरभूखंडावर कांदळवन लागवडीचे नियोजन आहे. त्यासाठी जमीन ताब्यात घेतली जात आहे. १३ कोटी लागवडीच्या कार्यक्रमावेळी सहा लाख कांदळवन लागवडीच उद्दीष्ठ असताना आठ लाख लागवड झाली. आताही २०० हेक्टरवरील लागवडीची तयार नोव्हेंबरमध्ये सुरू असल्याचे यावेळी नमुद करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभागाकडून सिंधुदूर्गमध्ये ६८ किमी. रस्त्यांच्या दुतर्फा, ४१ किमी. रेल्वे लाइन लागत, चार किमी.च्या कालव्याच्या दुतर्फा आदी सुमारे ३२४ किमी.च्या रस्त्यांसह जंगल क्षेत्रात वृक्ष लागवडीचे नियोजन केले. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील आढावा सुरू असतानाच्या प्रजेंटेशनमध्ये अकोला महापालिकेच्या पॉप्लेटचे चित्रिकरण चुकीने दाखवण्यात आल्याचे यावेळी निदर्शनात आले.
यंदाच्या वृक्ष लागवडीसाठी आतापासून जोरदार तयारी करण्याचे आदेश जारी झाले आहेत. त्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांचे सहकार्य घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. एप्रिलपर्यंत लोकसभेच्या निवडणुका पूर्ण होण्याची शक्यता खारगे यांनी यावेळी व्यक्त केली. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यास प्राधान्य देण्यात येईल. तरी देखील त्यांची सतत भेट घेऊन कार्यक्रमाच्या नियोजनाची कल्पना देण्याचे आदेशही त्यांनी वनअधिकाऱ्यांसह सीएफओ, डीएफओ आदींना दिले. वृक्ष लागवड कार्यक्रमांच्या तीन बैठकांपैकी पहिली बैठक आज दोन सत्रात पार पडत असल्याचे खारगे यांनी नमुद करून दुसरी बैठक एप्रिलच्या दुसऱ्यां  आणि शेवटची बैठक मंत्री, खासदार, आमदार यांच्याबरोबर होणार आहेत. त्यासाठी अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीच्या या कार्यक्रमात सतत पॅसीव, अ‍ॅक्टीव आणि प्रो अ‍ॅक्टीव राहण्याचा मंत्र खारगे यांनी यावेळी दिला.

 

Web Title: Lessons to the people to keep the environment in Konkan for mass movement of tree plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.