अधिकाऱ्यांना पत्र्याची शेड तर कोठडी गळकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2015 11:28 PM2015-07-27T23:28:43+5:302015-07-27T23:28:43+5:30

शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणेनगर या ब्रिटीशकालीन पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना पत्र्याच्या शेडमध्ये बसून काम करावे लागते. तर आरोपींची कोठडीही गळकी असल्यामुळे सर्वात

Let the staff shed the letter | अधिकाऱ्यांना पत्र्याची शेड तर कोठडी गळकी

अधिकाऱ्यांना पत्र्याची शेड तर कोठडी गळकी

Next

- जितेंद्र कालेकर,  ठाणे
ठाणे : शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणेनगर या ब्रिटीशकालीन पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना पत्र्याच्या शेडमध्ये बसून काम करावे लागते. तर आरोपींची कोठडीही गळकी असल्यामुळे सर्वात जुन्या पोलीस ठाण्याला बकाल अवस्था आली आहे. प्रचंड वर्दळीचे आणि मुख्य शासकीय कार्यालय असल्यामुळे नेहमीच मोर्चा आणि व्हीआयपी बंदोबस्तात व्यस्त असलेल्या या पोलीस ठाण्याला नविन इमारतीची गरज आहे.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील पाचही परिमंडळातील ३३ पोलीस ठाण्यांपैकी सर्वात जुन्या या ठाणेनगर पोलीस ठाण्यात १९१७ पासूनच्या नोंदी आहेत. अगदी इंग्रजांच्या काळातील पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यांच्या नोंदीही येथे आहेत. या पोलीस ठाण्याची आरोपींची कोठडीची क्षमता ३० ची आहे. येथे नौपाडा, कळवा, ठाणेनगर, गुन्हे अन्वेषण विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि खंडणी विरोधी पथक आदींनी पकडलेले आरोपी ठेवले जातात. इतर पोलीस ठाण्यांच्या तुलनेत ती सुरक्षित मानली जात असली तरी या कोठडीलाही गळती लागल्याने तिला प्लॅस्टीकचे छत चढविले आहे.
मुख्य बाजारपेठ, ज्वेलर्सची दुकाने, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती कारागृह, न्यायालय, जिल्हा परिषद अशी मुख्य शासकीय कार्यालये, कौपिनेश्वर मंदीर, विठ्ठल मंदीर आणि पेढ्या मारुती ही पुरातन मंदीरे याशिवाय, बस स्थानक आणि रेल्वे स्थानक यांच्या सुरक्षेचा ताण व सहा लाख लोकसंख्येची सुरक्षितता या पोलीस ठाण्याच्या कार्यकक्षेत आहे. म्हणजे ६ लाखांच्या सुरक्षेला अवघे सव्वाशे कर्मचारी अशी अवस्था इथे आहे. लोकसंख्येच्या निकषानुसार येथे आणखी पाच निरीक्षक, २५ उपनिरीक्षक आणि २५० पोलिसांची गरज आहे. या पोलीस ठाण्यातूनच १९९१ मध्ये कोपरी तर २००८ मध्ये राबोडी पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. फसवणूकीच्या गुन्ह्यांसह किरकोळ चोरी, हाणामारी चेन स्रॅचिंग, पाकिटमारी आणि मोबाईल चोरीचे प्रमाण अधिक आहे. तर बलात्कार, खूनाचा प्रयत्न हे गुन्हे महिन्याला किमान तीन ते चार असून ठकबाजीच्या १३ गुन्ह्यांची सहा महिन्यात नोंद झाली. एवढा कार्यभार सांभाळणारे अधिकारी पत्र्याच्या शेडमध्ये काम करीत असतील तर त्यांच्याकडून कोणत्या कार्यक्षमतेची अपेक्षा करावी? तहसिल कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात हलवून रिक्त जागेत हे पोलीसठाणे स्थलांतरीत केले तर पोलिसांना किमान मुलभूत सुविधातरी मिळतील .

Web Title: Let the staff shed the letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.