...तर महापालिकेसमोर बाप्पाची महाआरती करू; ठाणे जिल्हा गणेशोत्सव समितीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:31 PM2021-06-27T16:31:50+5:302021-06-27T16:32:12+5:30

ठाणे जिल्हा गणेशोत्सव समिती गणेशोत्सव समितीची किसननगर येथे आज दुपारी बैठक संपन्न झाली.

let's do Bappa's Maha Aarti in front of the Thane Municipal Corporation; Warning of District Ganeshotsav Committee | ...तर महापालिकेसमोर बाप्पाची महाआरती करू; ठाणे जिल्हा गणेशोत्सव समितीचा इशारा

...तर महापालिकेसमोर बाप्पाची महाआरती करू; ठाणे जिल्हा गणेशोत्सव समितीचा इशारा

Next

ठाणे : शासनाने उत्सवांच्या बाबतीत आपली भूमिका लवकर जाहीर न केल्यास सरकारला जागे करण्यासाठी पुढील २० जुलै आषाढी एकादशीच्या दिवशी ठाणे महानगर पालिकेसमोर आपले आराध्य दैवत गणपती बाप्पाची महाआरती घेण्यात येईल यात ठाण्यातील सर्व गणेशोत्सव मंडळे उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त करतील असा इशारा ठाणे जिल्हा गणेशोत्सव समितीने प्रशासनाला दिला. 

ठाणे जिल्हा गणेशोत्सव समिती गणेशोत्सव समितीची किसननगर येथे आज दुपारी बैठक संपन्न झाली. यावेळी मंडळाने वरील भूमिका एकमताने घेतली. आज झालेल्या मिटिंगमध्ये ठाण्यातील ७२ मंडळे ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने उपस्थित होती. आज झालेल्या मिटिंगमध्ये गणेशोत्सव मंडळांनी घेतलेले खालील निर्णय पुढील प्रमाणे.

१. गणेश मूर्तीच्या उंचीवरील बंधने शिथिल करावीत.
२.कोरोनाचे सर्व नियम पाळून गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यासाठी परवानगी देऊन सहकार्य करावे.
३.उत्सवासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या या सालाबाद प्रमाणे देण्यात याव्यात व यासाठी एक खिडकी योजना प्राधान्याने राबविण्यात यावी.
४.मंडळांच्या सर्व कार्यकर्त्यांचे लसीकरण उत्सवांच्या आधी होण्यासाठी विशेष तरतूद करावी.
५.मंडळांना विश्वासात घेऊनच २०२१ ची सुधारित नियमावली जाहीर करावी व मंडळांची व प्रशासनाची हि बैठक लवकरच लावावी.

आतापर्यंत गणेशोत्सव मंडळांनी सरकारला व पालिका प्रशासनाला संयम ठेवून सहकार्य केले आहे परंतू सरकार दाद नसेल तर आम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल असे समितीचे अध्यक्ष समीर सावंत म्हणाले.

Web Title: let's do Bappa's Maha Aarti in front of the Thane Municipal Corporation; Warning of District Ganeshotsav Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.