चला धावू या... स्मार्ट ठाण्यासाठी, महापौर मॅरेथॉनसाठी ठाणेनगरी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 05:48 AM2017-08-12T05:48:29+5:302017-08-12T05:48:29+5:30
अनेक वर्षांपासून क्र ीडा क्षेत्रात सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन रविवारी होत असून अनेक नामवंत राष्ट्रीय धावपटूंसह जवळपास २० हजार स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत.
ठाणे : अनेक वर्षांपासून क्र ीडा क्षेत्रात सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन रविवारी होत असून अनेक नामवंत राष्ट्रीय धावपटूंसह जवळपास २० हजार स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. ठाणेकरांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केले आहे. ‘चला धावू या स्मार्ट ठाण्यासाठी’, या घोषवाक्यासह हजारो स्पर्धक रविवारी सकाळी ६.३० वाजता स्मार्ट ठाण्यासाठी धावणार आहेत.
महापालिका मुख्यालय चौकातून या २८ व्या मॅरेथॉनला प्रारंभ होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या स्पर्धेला सुरु वात होईल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते स्पर्धेचा पारितोषिक समारंभ होणार आहे. या वेळी खा. राजन विचारे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, आ. प्रताप सरनाईक, डॉ. जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, सुभाष भोईर, अॅड. निरंजन डावखरे, रवींद्र फाटक, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, महाराष्टÑ हौशी अॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष आदिल सुमारीवाल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गेल्या वर्षापासून या मॅरेथॉनमध्ये २१ किमी पुरु ष गट आणि १५ किमी महिला गट या दोन मुख्य स्पर्धेतील धावपटूंना टाइम चीप देण्यास सुरुवात झाल्याने अनेक राष्ट्रीय धावपटू या मॅरेथॉनमध्ये भाग घेतात.
आंतरराष्ट्रीय क्रीडापटूंचा सहभाग
या मॅरेथॉनसाठी २०१९ मध्ये होणाºया कॉमनवेल्थमध्ये कराटेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणारी आंतरराष्ट्रीय कराटेपटू संध्या शेट्टी उपस्थित राहणार आहे. तर, या मॅरेथॉनमध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्र ीडापटू सहभागी होणार आहेत. त्यामध्ये नाशिक येथून रिशू सिंग, आरती पाटील या महिला खेळाडू व नरेंद्र प्रताप आणि पिंटू यादव आदी खेळाडूंचा समावेश आहे.