... त्या ३६ शिक्षकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 05:39 AM2018-12-21T05:39:02+5:302018-12-21T05:39:07+5:30
नवी मुंबईत समायोजनाची मागणी : मराठी माध्यमाच्या ६५ जागांवर सामावून घ्या
ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी आणि अप्पर मुख्य सचिव यांनी दिलेल्या सरसकट समायोजनाच्या आदेशानंतर जिल्ह्यातील अतिरिक्त ३६ मराठी माध्यमांच्या शिक्षकांना समायोजन करून घेण्यास नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाने नकार दिल्याचा आरोप करून त्या ३६ शिक्षकांनी अखेर समायोजनासाठी मुख्यमंत्र्यांसह शिक्षणमंत्र्यांना निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.
राज्यभर अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा परिषदेत सरसकट तत्काळ समायोजन करण्याची कार्यवाही चालू आहे. त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांनी खाजगी शाळेतील अतिरिक्त शिक्षकांच्या समुपदेशनाने २३ आॅक्टोबर २०१८ रोजी ठाणे जिल्ह्यातील विविध महापालिकांत समायोजन केले. त्यापैकी नवी मुंबई महापालिकेत मराठी माध्यमाचे ६२, गुजरातीचे १८ व हिंदी माध्यमाचे पाच अशा एकूण ८५ शिक्षकांचे समायोजन केले होते. त्यापैकी नवी मुंबई महापालिकेने मराठी २६ व हिंदी पाच अशा एकूण ३१ शिक्षकांना सामावून घेतले. उर्वरित शिक्षकांना वरिष्ठांचे आदेश असल्यास सामावून घेण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर, शिक्षण सचिवांच्या भेटीत १५ नोव्हेंबर २०१८ रोजी शासनास सरसकट समायोजन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या महापालिकांनी शिक्षकांना हजर करून घेतले. तरीसुद्धा, नवी मुंबई महापालिकेने त्यांच्याकडे रिक्त असलेल्या मराठी माध्यमांच्या ६५ जागांवर ३६ शिक्षकांना सरसकट सामावून घेणे आवश्यक होते.
वरिष्ठांच्या आदेशानंतर कार्यवाहीं
नवी मुंबई महापालिकेने मराठी २६ व हिंदी पाच अशा एकूण ३१ शिक्षकांना सामावून घेतले. उर्वरित शिक्षकांना वरिष्ठांचे आदेश असल्यास सामावून घेण्यात येईल, असे सांगितले.ंं