एलआयसीचा व्यवसाय ठप्प झाल्याने तो बनला बोगस टीसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:06 AM2021-05-05T05:06:51+5:302021-05-05T05:06:51+5:30

कल्याण : एलआयसीचा व्यवसाय ठप्प झाल्याने तो बोगस टीसी बनला होता. मात्र, पहिल्या दिवशी त्याच्या बोगसपणाचा पर्दाफाश करून कल्याण ...

LIC's business stalled and it became a bogus TC | एलआयसीचा व्यवसाय ठप्प झाल्याने तो बनला बोगस टीसी

एलआयसीचा व्यवसाय ठप्प झाल्याने तो बनला बोगस टीसी

Next

कल्याण : एलआयसीचा व्यवसाय ठप्प झाल्याने तो बोगस टीसी बनला होता. मात्र, पहिल्या दिवशी त्याच्या बोगसपणाचा पर्दाफाश करून कल्याण रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली. अटक केलेल्या बोगस टीसीचे नाव अशरफ अली असे असून, तो भांडुप येथील रहिवासी आहे.

अशरफ हा एलआयसी एजंट आहे. त्याची एजंटगिरी लॉकडाऊनमुळे बंद पडली. त्याला आर्थिक विवंचना होती. तो विनातिकीट कल्याण ते नाशिक असा प्रवास करीत असताना त्याला इगतपुरी स्टेशनवर टीसीने पकडले. त्याच्याकडून पावती फाडून दंड वसूल केला. ही घटना पाहून अशरफला टीसी होण्याचे सुचले. त्याने त्याला दिलेली पावती पाहून हुबेहूब पावती पुस्तक तयार केले. गुगलच्या साहाय्याने टीसीचे आयकार्ड तयार केले. काळा कोट आणि पांढरा शर्ट परिधान करून तो कल्याण रेल्वेस्थानकात पोहोचला. त्याठिकाणी एका प्रवाशाचे तिकीट तो तपासत होता. तेव्हा रेल्वे पोलीस राजू आखोडे यांना संशय आला. ते अन्य एका टीसीला घेऊन अशरफच्या दिनेशे गेले. अशरफची खोलात जाऊन विचारपूस केली असता तो बोगस टीसी असल्याचे उघड झाले. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

----------------------

Web Title: LIC's business stalled and it became a bogus TC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.