जिंदगी सबसे बडी टीचर है- नसीरुद्दीन शाह

By admin | Published: December 6, 2015 12:31 AM2015-12-06T00:31:25+5:302015-12-06T00:31:25+5:30

मला क्रिकेटर बनण्याची इच्छा होती. पण त्या खेळात अवघे ११ जण असतात आणि कलाकार मात्र भरपूर असतात. तिथे भरपूर स्कोप असतो. त्यामुळेच मी अ‍ॅक्टींगकडे वळलो. मला

Life is the biggest teacher - Naseeruddin Shah | जिंदगी सबसे बडी टीचर है- नसीरुद्दीन शाह

जिंदगी सबसे बडी टीचर है- नसीरुद्दीन शाह

Next

ठाणे : मला क्रिकेटर बनण्याची इच्छा होती. पण त्या खेळात अवघे ११ जण असतात आणि कलाकार मात्र भरपूर असतात. तिथे भरपूर स्कोप असतो. त्यामुळेच मी अ‍ॅक्टींगकडे वळलो. मला चांगले प्रशिक्षण हवे होते. पण तसे ना मला क्रिकेटमध्ये मिळाले ना अभिनयात. जगण्याने मला अभिनय शिकवला. समृद्ध केला. जिंदगी सबसे बडी टिचर है, असे सांगत प्रसिध्द चित्रपट अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. इंद्रधुनच्या रंगोत्सवातील गप्पांमध्ये त्यांच्यातील समृद्ध कलावंत उलगडत गेला आणि श्रोते मंत्रमुग्ध झाले.
१६ व्या वर्षी मी अ‍ॅक्टींगसाठी घराबाहेर पडलो. तेव्हा जो जगाचा अनुभव मला मिळाला, तोच मला उत्तम भूमिका साकार करण्यासाठी कामी आल्याचेही त्यांनी सांगितले.
शाळेत मला गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राची भीती वाटायची. त्याच काळात साहित्याची मात्र गोडी लागली होती. ते आवडायचे. गोष्टी, नाटक आणि कविताही मनापासून आवडायच्या. एक माणूस दुसऱ्याशी कसा वागतो, ते जाणून घ्यायला आवडायच. कदाचित त्यातूनच अभिनयाची आवड फुलली असावी. त्यामुळे अभिनयासाठी जेव्हा घर सोडले, तेव्हाच्या काळात परिस्थितीचे चटके बसले खरे, पण माणसे खूप वाचता आली. त्या माणसांनी मला जगणे शिकवले आणि या जगण्यान अभिनय शिकविला.
मराठी कलावंतांच्या समृद्ध परंपरेचा उल्लेख करताना निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, भक्ती बर्वे हे चारही कलाकार दिग्गज असल्याचे ते म्हणाले. हे कलावंत जगातील दहा श्रेष्ठ कलांवतांपैकी असल्याचे गौरवोद््गारही शाह यांनी काढले.
अभिनय ही शिकवण्याची गोष्ट नाही. ती एखाद्या कोर्समधून शिकता येत नाही. जेवढे शिकवले आहे, त्या पलिकडेही अ‍ॅक्टिंग असते. एखादा जादूगार येईल आणि आपल्याला अ‍ॅक्टींग शिकवेल, असे वाटत असेल तर ते विसरुन जा. आपल्यावर-स्वत:वर विश्वास ठेवा. मोकळपणाने जगाकडे पाहा आणि रस्त्यात शिकवणारा कोणी मिळाला तर त्याच्याकडूनही शिका, असा सल्ला त्यांनी दिला. रंगभूमीवरील अभिनयाच्या जीवंतपणाबद्दल ते भरभरून बोलले. मला आयुष्यभर रंगभूमीवर रहायला आवडेल, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

‘घडवलेले’ कलावंत
अभिनयाच्या कार्यशाळा पूर्ण करणाऱ्यांना शाह यांनी बरेच चिमटे काढले. असे घडवलेले कलावंत आयत्यावेळी दोन शब्दही बोलू शकत नाहीत. हातातील स्क्रीप्टमध्य दिलेल्या डॉयलॉगखाली अंडरलाईन करतात आणि तेवढेच वाचतात. सूंपूणर््ा स्क्रीप्टच महत्वाची असते हे ते विसरतात, असा टोला त्यांनी लगावला.

Web Title: Life is the biggest teacher - Naseeruddin Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.