व्यसनी भावाचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:30 AM2021-06-01T04:30:44+5:302021-06-01T04:30:44+5:30

ठाणे : दारूसाठी पैसे मागितल्यानंतर ते न दिल्यामुळे शिवीगाळ करणाऱ्या धाकट्या आकाश (१९) या व्यसनी लहान भावाचा लाकडी दांडक्याने ...

Life imprisonment for the murder of an addicted brother | व्यसनी भावाचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

व्यसनी भावाचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

Next

ठाणे : दारूसाठी पैसे मागितल्यानंतर ते न दिल्यामुळे शिवीगाळ करणाऱ्या धाकट्या आकाश (१९) या व्यसनी लहान भावाचा लाकडी दांडक्याने खून करणाऱ्या सुनील तुकाराम माने (२८) या मोठ्या भावाला ठाणे न्यायालयाने नुकतीच जन्मठेपेसह तसेच एक हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तो भरल्यास अतिरिक्त एक महिना कैदेची शिक्षा सुनावली आहे.

आईनेच याप्रकरणी आपल्या मुलाविरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मुख्य न्यायाधीश आर. एम. जोशी यांच्या न्यायालयात २८ मे २०२१ रोजी या खटल्याची सुनावणी झाली. सुनील याच्याविरुद्ध नारपोलीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय बेंडे यांनी सक्षम पुरावे न्यायालयात सादर केले. यात सख्ख्या भावानेच भावाचा खून केला होता, तर फिर्यादी ही आरोपीची आई आहे. खटल्याच्या सुनावणीदरम्यान फिर्यादी फितूर झाली असतानाही उत्कृष्ट तपासामुळे तसेच न्यायालयात इतर साक्षीपुरावे चांगल्या प्रकारे मांडण्यात पोलिसांना यश आले. पोलीस उपनिरीक्षक गोरडे, लेखनिक कारकून इशी, पैरवी अधिकारी जाधव आणि पाचेगावकर यांनी खटल्यात साक्षी पुरावे गोळा करण्यासाठी उत्तम कामगिरी पार पाडली. सरकारी वकील म्हणून विवेक कडू यांनी आरोपीला शिक्षा मिळण्यासाठी जोरदार बाजू मांडली. त्यामुळेच या सर्व बाबी ग्राह्य धरून न्या. आर. एम. जोशी यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

* काय घडला होता प्रकार

भिवंडीतील नारपोली येथे १२ ऑक्टोबर २०१७ रोजी देवजीनगर येथील शिवसेना कार्यालयाजवळ आकाश याने सुनीलकडे दारूसाठी पैसे मागितले होते. ते त्याने दिले नाही म्हणून शिवीगाळ केली. याचाच राग आल्यामुळे सुनीलने घरातील लाकडी दांडक्याने आकाशच्या डोक्यावर, कपाळावर आणि मानेवर मारहाण केली होती. यात गंभीर जखमी झालेल्या आकाशचा मृत्यू झाला होता. त्यामुळेच आईनेच खुनी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

Web Title: Life imprisonment for the murder of an addicted brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.