धाकटया व्यसनी भावाचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 12:03 AM2021-06-01T00:03:42+5:302021-06-01T00:06:09+5:30
दारुसाठी पैसे मागितल्यानंतर ते न दिल्यामुळे शिवीगाळ करणाºया धाकटया आकाश (१९) या व्यसनी लहान भावाचा लाकडी दांडक्याने खून करणाºया सुनिल तुकाराम माने (२८) या मोठया भावाला ठाणे न्यायालयाने नुकतीच जन्मठेपेची तसेच एक हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: दारुसाठी पैसे मागितल्यानंतर ते न दिल्यामुळे शिवीगाळ करणाºया धाकटया आकाश (१९) या व्यसनी लहान भावाचा लाकडी दांडक्याने खून करणाºया सुनिल तुकाराम माने (२८) या मोठया भावाला ठाणेन्यायालयाने नुकतीच जन्मठेपेची तसेच एक हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिना कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
आईनेच याप्रकरणी आपल्या मुलाविरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मुख्य न्यायाधीश आर. एम. जोशी यांच्या न्यायालयात २८ मे २०२१ रोजी या खटल्याची सुनावणी झाली. सुनिल याच्याविरुद्ध नारपोलीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय बेंडे यांनी सक्षम पुरावे न्यायालयात सादर केले. यात सख्या भावानेच भावाचा खून केला होता. तर फिर्यादी ही आरोपीची आई आहे. खटल्याच्या सुनावणी दरम्यान फिर्यादी फितूर झाली असतांनाही उत्कृष्ट तपासामुळे तसेच न्यायालयात इतर साक्षीपुरावे चांगल्या प्रकारे मांडण्यात पोलिसांना यश आले. पोलीस उपनिरीक्षक गोरडे, लेखनिक कारकून इशी, पैरवी अधिकारी जाधव आणि पाचेगावकर यांनी खटल्यात साक्षी पुरावे गोळा करण्यासाठी उत्तम कामगिरी पार पाडली. सरकारी वकील म्हणून विवेक कडू यांनी आरोपीला शिक्षा मिळण्यासाठी जोरदार बाजू मांडली. त्यामुळेच या सर्व बाबी ग्राहय धरुन न्या. आर. एम. जोशी यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
* काय घडला होता प्रकार-
भिवंडीतील नारपोली येथे १२ आॅक्टोबर २०१७ रोजी देवजीनगर येथील शिवसेना कार्यालयाजवळ आकाश याने सुनिलकडे दारुसाठी पैसे मागितले होते. ते त्याने दिले नाही म्हणून शिवीगाळ केली. याचाच राग आल्यामुळे सुनिलने घरातील लाकडी दांडक्याने आकाशच्या डोक्यावर, कपाळावर आणि मानेवर मारहाण केली होती. यात गंभीर जखमी झालेल्या आकाशचा मृत्यु झाला होता. त्यामुळेच आईनेच खूनी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.