काकाच्या हत्येप्रकरणी पुतण्याला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:59 AM2019-09-20T00:59:39+5:302019-09-20T00:59:42+5:30

पुतण्या रवींद्र काशिनाथ डगला (२८) याला पालघर जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस. घुलाने यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Life imprisonment for nephew's murder | काकाच्या हत्येप्रकरणी पुतण्याला जन्मठेप

काकाच्या हत्येप्रकरणी पुतण्याला जन्मठेप

Next

ठाणे/ पालघर : जमिनीच्या वादातून काका जनू डगला (५०) यांच्यावर कु-हाडीने वार करून त्यांची हत्या करणारा पुतण्या रवींद्र काशिनाथ डगला (२८) याला पालघर जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस. घुलाने यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना डहाणू तालुक्यातील चारोटी, डोंगरीपाडा येथे १८ मार्च २०१६ रोजी घडली होती. या खटल्यात सरकारी वकील म्हणून दीपक तरे यांनी काम पाहिले.
जनू डगला आणि रवींद्र डगला यांच्यात जमिनीच्या कारणावरून भांडण झाले होते. घटनेच्या दिवशी जनू हे घराच्या अंगणात झोपले असताना, रवींद्र याने कुºहाडीने त्यांच्या डोक्यावर, मानेवर, खांद्यावर व तोंडावर वार करून ठार केले. यावेळी फिर्यादी आणि साक्षीदारांनी आरडाओरड केल्यावर आरोपी हा त्यांच्याही अंगावर कु ºहाड घेऊन धावून गेला. त्यांनाही आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली. कासा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यावर आरोपीला अटक करण्यात आली. हा खटला पालघर जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश घुलाने यांच्यासमोर आल्यावर सरकारी वकील तरे यांनी आठ साक्षीदारांची साक्ष आणि पुरावे सादर केले. ते ग्राह्यमानून रवींद्र डगला याला जन्मठेपेची शिक्षा व साडेतीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

Web Title: Life imprisonment for nephew's murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.