आयुष्यमान भारत योजनेचा ठाण्यात रविवारी शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 03:18 AM2018-09-22T03:18:37+5:302018-09-22T03:18:39+5:30

देशभरात प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तथा आयुष्यमान भारत या योजनेचा शुभारंभ येथील ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत २३ सप्टेंबर रोजी होणार आहे.

Life Insurance Plan launched in Thane on Sunday | आयुष्यमान भारत योजनेचा ठाण्यात रविवारी शुभारंभ

आयुष्यमान भारत योजनेचा ठाण्यात रविवारी शुभारंभ

Next

ठाणे : देशभरात प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तथा आयुष्यमान भारत या योजनेचा शुभारंभ येथील ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत २३ सप्टेंबर रोजी होणार आहे. याच दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झारखंड राज्यातील रांची येथे होणार आहे.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडणाऱ्या या योजनेच्या शुभारंभाला जावडेकर यांच्यासह ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हेही उपस्थित असतील. दुपारी १२ वाजता प्रारंभ होणाºया या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात पाच कुटुंबांना हेल्थकार्डचे वाटप करण्यात येईल, असे ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील साडेतीन लाख कुटुंबांना होणार आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ८३ हजार ८९३, तर शहरी भागातील दोन लाख ६५ हजार कुटुंबांना याचा लाभ होईल, असे योजनेचे जिल्हा समन्वयक प्रवीण मोटे यांनी सांगितले.
राज्य आरोग्य हमी सोसायटी, जीवनदायी भवन, वरळी येथून या योजनेचे नियंत्रण केले जाणार आहे. यासाठी निकषास अनुसरून निवडलेल्या कुटुंबांना प्रतिवर्षी प्रतिकुटुंब आरोग्यासाठी पाच लाख रुपये विमा संरक्षण राहील. या योजनेंतर्गत त्या कुटुंबांना ठरावीक आजारासाठी संपूर्ण देशभरातील कोणत्याही मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचार घेता येतील. या योजनेमध्ये सुमारे एक हजार १२२ आजारांचा समावेश आहे. यासाठी लाभार्थी कुटुंबांना ई-कार्ड देण्यात येणार आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रु ग्णालय व भिवंडी येथील इंदिरा गांधी, कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज तसेच उल्हासनगर येथील रूग्णालये संलग्नित केली आहेत.
>यांना मिळणार लाभ : आयुष्यमान भारत योजनेत पात्र लाभार्थी ग्रामीण भागातील अनुसूचित जातीजमातीचे, दारिद्रयरेषेखालील कुटुंब, भूमिहीन, दिव्यांग सदस्य असलेले कुटुंब, अतिकष्टाचे काम करणारे कुटुंब, एका खोलीत कच्च्या घरात राहणारे, महिला कुटुंबप्रमुख असलेले यांचा या योजनेत सहभाग आहे. शहरी भागातील कचरा वेचणारे कुटुंब, भिकारी, घरकाम करणारे, रस्त्यावर विक्र ी करणारे, बांधकाम, रंगकाम, प्लम्बर, गवंडी, वेल्डर, गटई कामगार, फेरीवाले, सफाई कामगार, हस्तकला कारागीर, शिंपी, वाहतूक कर्मचारी, चालक, वाहक व सायकलरिक्षा ओढणारे, दुकानात काम करणारे शिपाई, अटेंडंट, हॉटेल वेटर, मेकॅनिक / वीजतंत्री, असेम्ब्ली, दुरु स्ती करणारे, धोबी आणि चौकीदार आदींच्या कुटुंबांना या योजनेत पात्र ठरवण्यात आले आहे.

Web Title: Life Insurance Plan launched in Thane on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.