एसटी महाराष्ट्राची लाईफ लाईन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
By अजित मांडके | Published: February 13, 2024 05:23 PM2024-02-13T17:23:00+5:302024-02-13T17:23:53+5:30
एसटी ही महाराष्ट्राची लाईफलाईन असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
अजित मांडके ,ठाणे : काळ बदलत आहे, स्पर्धात्मक युग येत आहे. तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. त्यात आता एसटीने देखील कात टाकली आहे. इलेक्ट्रीक एसी बस या प्रवाशांच्या सोईसाठी उपलब्ध झाल्या आहेत. एसटी मागील कित्येक वर्षापासून महाराष्ट्रातील शहरी भागासह ग्रामीण भागातील प्रवाशांना सोय देत आहे. त्यामुळे एसटी ही महाराष्ट्राची लाईफलाईन असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गावकरी आणि एसटी यांच्यात एक ऋणाबंधाचे नाते आहे, ते पुढेही जपले गेले पाहिजे असेही ते म्हणाले.
प्रदुषणमुक्त, पर्यावरणपुरक, वातानुकुलित तरीही किफायतशीर दरात धावणाºया ई बसचे लोकापर्ण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील एसटीच्या खोपट डेपो येथे मंगळवारी करण्यात आले. एसटीच्या ताफ्यात ५१५० इबसचे लोकापर्ण यावेळी करण्यात आले. यावेळी त्यांनी हे प्रतिपादन केले. या इ बस बोरीवली - ठाणे - नाशिक या मार्गावर चालविल्या जाणार असून टप्यटप्याने राज्याच्या प्रत्येक भागात ही बससेवा सुरु होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्यभरात १७३ पेक्षा जास्त बसस्थानकांवर ई बस चार्गींग स्टेशनचे कामही सुरु झाले असल्याचे त्यांनी यावेळी नमुद केले. ग्रामीण भागातील नागरीकासाठी एसटी ही लालपरी आहे. ग्रामीण भागातील प्रवाशी आणि वाहक, चालक यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचे ऋणानुबंध असल्याचेही त्यांनी सांगितले. जिथे कोणतेही वाहन पोहचत नाही, तिथे एसटी पोहचत असल्याचेही त्यांनी सांगितले. तर ५ हजाराहून अधिक डिझेल बसचे देखील एल.एन.जी. मध्ये प्रवार्तीत करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. अशा प्रकारच्या बस सेवेत आल्यानंतर, निश्चितच प्रदुषणात घट होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मागील काही वर्षात एसटी देखील जोमाने काम करीत आहे, पर्यावरण समतोल राखण्याचे कामही आता एसटीच्या माध्यमातून सुरु झाले आहे. त्यामुळेच मागील काही वर्षात तोट्यात सुरु असलेली एसटीची सेवा आता पुन्हा अंशी चांगल्या पध्दतीने सुधारतांना दिसत आहे. एसटीचे डेपो स्वच्छतेसाठी बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानका अतंर्गत स्वच्छता मोहीमेसाठी एमआयडीसीकडून ६०० कोटींचा निधी दिला आहे. मागील आठ महिन्यांपासून त्यानुसार काम सुरु आहे. परंतु खोपट एसटी डेपोबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. येथे रंगरंगोटी का झाली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
चांगले काम करणाऱ्यांना मी शाबासकी देतो, मात्र चांगले काम करायचे नसले तर त्यांच्या बाबतीत काय करायचे हे सुध्दा मला ठाऊक आहे. त्यामुळे प्रत्येक एसटी डेपो, बस स्थानक हे स्वच्छ असलेच पाहिजे, तेथे येणाºया प्रवाशांना चांगल्या सोई सुविधा पुरविल्या पाहिजे, स्वच्छ शौचालय देखील दिलेच पाहिजे. बसची स्वच्छता, साफसफाई झालीच पाहिजे, याशिवाय वाहक, चालक आदींसह इतर कर्मचाºयांसाठी असलेले विश्रांती कक्ष देखील चांगले असेल पाहिजे अशी सुचनाही त्यांनी केली. अधिकाºयांनी देखील चांगल्या पध्दतीने काम करायला हवे, मला धावणारा माणूस पाहिजे, थांबणारा माणूस नका असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. जे कर्मचारी चांगली सेवा देत असतील त्यांचे कौतुक करा, त्यांचा सत्कार करा, त्यांना प्रोत्साहन भत्ता द्या, त्यामुळे इतर कर्मचाºयांना देखील त्यांच्या पासून प्रोत्साहन मिळून ते देखील चांगले काम करतील असेही त्यांनी सांगितले. प्रवासी वाढविण्यासाठी वेगवगळे प्रयोग करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणार :
एसटी कर्मचाऱ्यांचे आजही काही प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठी मी कटीबध्द आहे. त्यानुसार माझ्या दालनात एकदा बैठक लावा, त्यात शॉर्ट टर्म, लॉंग टर्म पध्दतीने कर्मचाºयांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चित धोरण ठरवू आणि कर्मचाºयांचे प्रश्न मार्गी लावू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
खोपट डेपोची पाहणी :
एसटी डेपोच्या दुरावस्थेबाबत आणि अस्वस्छतेबाबत एकनाथ शिंदे यांनी अधिकाºयांचे कान टोचल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष खोपट डेपोमधील स्वच्छतागृहासह, चालक वाहकांच्या विश्रांतीगृहाची पाहणी देखील केली.