संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 06:01 PM2017-08-20T18:01:39+5:302017-08-20T18:01:50+5:30
जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
Next
ठाणे, दि. 20 - जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मुरबाडजवळील माळशेज घाटातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. शहापूर तालुक्यातून वाहत येणा-या भातसा नदीला पूर आल्यामुळे सापगांवाकडे जाणा-या पुलावरील वाहतूक बंद करावी लागली. याशिवाय कल्याणजवळील वाळकस पुलावरही सुमारे तीन फूट पुराचे पाणी वाहत असल्यामुळे हा पूलही रहदारीसाठी बंद केला. ठाणे शहरातील 30 फूट उंच कंपाऊंडची भिंत पडली आहे. या पावसादरम्यान जिल्ह्यात कोठेही जीवितहानी झाली नाही. लोकल गाड्यांचे वेळापत्रक दिवसभर कोलमडल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.