टिटवाळासह ग्रामीण भागात पावसाची वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 09:16 PM2019-10-05T21:16:29+5:302019-10-05T21:16:39+5:30

गेली दोन दिवसापासून उकाडा वाढला होता. शनिवारी दुपार पासूनच तर कमालीचा उकाडा जाणवत होता,अखेर सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने जोरदार वादळी वार्यासह विजांच्या कडकडाटात हजेरी लावत सर्वांची त्रेधाच उडवून टाकली.

Light thunderstorm with thunderstorms in rural areas including Titwala | टिटवाळासह ग्रामीण भागात पावसाची वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार हजेरी

टिटवाळासह ग्रामीण भागात पावसाची वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार हजेरी

Next

टिटवाळा: गेली दोन दिवसापासून उकाडा वाढला होता. शनिवारी दुपार पासूनच तर कमालीचा उकाडा जाणवत होता,अखेर सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने जोरदार वादळी वार्यासह विजांच्या कडकडाटात हजेरी लावत सर्वांची त्रेधाच उडवून टाकली. याच दरम्यान मोहने येथील विज वितरण कंपनीच्या मुख्य फिडर मधून विजपुरवठा करणाऱ्या विज वाहीनीवर विज पडल्याने विजपुरवठा जवळ जवळ चार तास पूर्णपणे खंडित झाला होता. 

शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जोराचा वारा व विजांचा कडकडाट सुरू झाला. त्याच पाठोपाठो पावसाने देखील जोरदार कोसळण्यास सुरूवात केली. जणू काय जुलै महिन्यातीलच पाऊस सुरू झाला आहे काय, असे चित्र दिसून येत होते. परंतू पंधरा ते वीस मिनिटे जोरात बरसल्या नंतर अचनक पावसाचे जोराने बरसणे थांबले व रिमझिम सुरू झाली. यात मात्र बळीराजा, चाकरमानी, व्यवसाईक, फेरीवाले व तसेच सध्या सुरू असलेल्या नवरात्र उत्सव   मंडळाच्या कार्यकर्त्यांची मात्र कमालीची त्रेधा उडाली. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने कुठे तरी झाले उन्मळून पडणे, छप्पर उडणे अशा प्रकारच्या घटना घडल्या असल्याचे तर्क वितर्कांना उधाण आले आहे. याच वेळी मोहने येथील

विज वितरण कंपनीच्या मुख्य फिडर मधून विजपुरवठा करणाऱ्या विज वाहीनीवर विज पडल्याने विजपुरवठा जवळ जवळ चार तास पूर्णपणे खंडित झाला होता. यामुळे टिटवाळा, मोहने व खडवली शहरी भागासह लगतच्या 70 गावात आंधाराचे साम्राज्य पसरलेले होते. रात्री नऊ वाजताच्या सुमारास विजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना यश आले. उशीरा पर्यंत पावसाची  रिप रिप सुरू होती. यामुळे नवरात्र उत्सवावर मात्र पावसाचे विर्जण पडल्याने दुर्गा भक्तांत नाराजीचे वातावरण दिसून आले.

Web Title: Light thunderstorm with thunderstorms in rural areas including Titwala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.