उल्हासनगरात विजेचा लपंडाव, आमदार आयलानी यांनी घेतली बैठक
By सदानंद नाईक | Published: June 28, 2023 06:19 PM2023-06-28T18:19:31+5:302023-06-28T18:19:43+5:30
उल्हासनगर : शहरातील विविध भागात विजेचा लपंडाव सुरू झाल्याने, नागरिकांसह व्यापारी हैराण झाले. दरम्यान आमदार कुमार आयलानी यांनी घेऊन ...
उल्हासनगर : शहरातील विविध भागात विजेचा लपंडाव सुरू झाल्याने, नागरिकांसह व्यापारी हैराण झाले. दरम्यान आमदार कुमार आयलानी यांनी घेऊन महावितरण अधिकाऱ्याची बैठक घेऊन विजेच्या लपंडाव बाबत धारेवर धरले.
उल्हासनगरात विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण झाले असून पावसाळ्यात काही अनुचित घटना होऊ नये म्हणून सुरक्षितेचे कारण सांगून वीज पुरवठा बंद केला जात असल्याची माहिती महावितरण विभागाचे अधिकारी देतात. तर अनेक ठिकाणी शॉर्टसर्किट तसेच झाडे पडून वीज पुरवठा बंद होत असल्याचे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात कोट्यवधी रुपये खर्चूनही उघडे रोहित्र, जुन्या झालेल्या विधुत वाहिन्या, दुरुस्ती न केलेले विजेचे खांब आदी कारणाने वीज पुरवठा खंडित होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिक व व्यापाऱ्यांच्या तक्रारीची दखल आमदार कुमार आयलानी यांनी घेऊन बुधवारी दुपारी महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता सत्येज कुलकर्णी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना आमदार कार्यालयात बोलावून चर्चा केली. संततधार पावसाने वीज पुरवठा खंडित होत असल्याची कबुली अधिकाऱ्यांनी दिल्यावर वीज पुरवठा काही दिवसात सुरळीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार आयलानी यांच्या कार्यालयातील बैठकीला महावितरण विभागाचे अभियंता कुलकर्णी यांच्यासह विभागीय शाखा अभियंते, भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, महेश।सुखरामनी यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.