गणेशोत्सवाप्रमाणेच सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचे मंडप भाडेही माफ होणार

By अजित मांडके | Published: September 20, 2022 04:00 PM2022-09-20T16:00:19+5:302022-09-20T16:00:37+5:30

  ठाणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील ठाणे महापालिका हद्दीतील सर्व सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाना संपूर्णत: भाडेमाफ द्यावी अशी ...

Like Ganeshotsav, mandap rent for public Navratri festival will also be waived off | गणेशोत्सवाप्रमाणेच सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचे मंडप भाडेही माफ होणार

गणेशोत्सवाप्रमाणेच सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचे मंडप भाडेही माफ होणार

Next

 ठाणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील ठाणे महापालिका हद्दीतील सर्व सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाना संपूर्णत: भाडेमाफ द्यावी अशी लेखी मागणी ठाण्याचे माजी महापौर व शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचेकडे केली आहे. याची तातडीने दखल घेवून आयुक्तांनी तातडीने सकारात्मक निर्णय घेवून सर्व नवरात्रौत्सव मंडळाचे भाडेमाफ केल्याबद्दल त्यांचे आभार देखील व्यक्त केले आहेत.

मागील दोन वर्षे कोरोनाचा काळ असल्यामुळे बहुतांशी सार्वजनिक मंडळे आर्थिक विवंचनेत आहेत. सर्व सार्वजनिक मंडळे सामाजिक उपक्रम राबवित असतात, या मंडळांचा  शहराच्या जडणघडणीत मोलाचा सहभाग नेहमीच असतो. सामाजिक बांधिलकी जपत ही मंडळे गेली अनेकवर्षे काम करीत आहेत, या मंडळांना दिलासा मिळावा या दृष्टीकोनातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे संपूर्ण भाडे  माफ केले होते, यामुळे सार्वजनिक मंडळांना निश्चितच दिलासा मिळाला आहे, याच धर्तीवर सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना देखील संपूर्ण भाडे माफी द्यावी अशी मागणी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केल्यावर त्यांनी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांचे भाडे माफ करावे असे आदेश सर्व संबंधितांना दिले आहेत.
            या निर्णयामुळे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना देखील दिलासा मिळणार आहे. सर्व मंडळांनी महापालिकेने आखून दिलेल्या नियमांचे पालन करुन नवरात्रौत्सव साजरा करावा असे आवाहन म्हस्के यांनी केले आहे. 
 

 

Web Title: Like Ganeshotsav, mandap rent for public Navratri festival will also be waived off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.