मुंब्य्रासह दिव्यालाही मिळणार मुबलक पाणी, पालिकेची १९६ कोटींची रिमॉडेलिंगची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 04:07 PM2018-08-25T16:07:48+5:302018-08-25T16:10:30+5:30

मुंब्रा आणि दिव्याची तहान भागविण्यासाठी ठाणे महापालिकेने नव्याने रिमॉडेलिंगची योजना पुढे आणली आहे. त्यानुसार यासाठी १९६ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या संदर्भातील प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला आहे.

Likewise, with the help of Mumbra, a remodeling scheme worth Rs. 196 crores is available. | मुंब्य्रासह दिव्यालाही मिळणार मुबलक पाणी, पालिकेची १९६ कोटींची रिमॉडेलिंगची योजना

मुंब्य्रासह दिव्यालाही मिळणार मुबलक पाणी, पालिकेची १९६ कोटींची रिमॉडेलिंगची योजना

googlenewsNext
ठळक मुद्दे१० नव्या जलकुंभाची केली जाणार उभारणीमहापालिका आणि एमआयडीसीकडून वाढणार पाणी पुरवठा

ठाणे - ठाणे महापालिकेने घोडबंदरच्या रिमॉडेलिंगचा प्रस्ताव पुढे आणल्यानंतर आता मुंब्य्राचीही तहान याच बेसवर भागविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार येत्या महासभेत या मुंब्य्राच्या रिमॉडेलिंगचा प्रस्ताव पटलावर ठेवण्यात आला आहे. यामुळे येत्या काळात मुंब्य्राची तहान भागली जाणार आहे. आता हे काम महापालिका स्वत: करणार असून यासाठी लागणाऱ्या खर्चात मात्र ६९ कोटींनी वाढ झाली आहे. या योजनेत आता दिव्याचाही समावेश करण्यात आल्याने ही वाढ झाल्याचे पालिकेचे म्हणने आहे.
                  ठाणे महापालिकेच्या वतीने मुंब्य्रातील पाणी वितरण व्यवस्थेचे रिमॉडेलिंग प्रकल्पाचा अहवाल तयार केला होता. त्यानुसार २०१०-११ मध्ये यासाठी ९७.४१ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. त्यानुसार केंद्राच्या जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत हे काम करण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु या योजनेसाठी निधी उपलब्ध होऊ शकला नाही. तसेच ही योजना देखील बंद झाली. त्यामुळे ही योजना कशी राबवयाची असा पेच पालिकेपुढे पडला होता. त्यानंतर केंद्राच्या अमृत योजनेतून पालिकेने हे काम करण्याचा पालिकेने विचार केला होता. परंतु अमृत योजनेतून देखील या प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही. अखेर पालिकेने आता या योजनेसाठी स्वत: खर्च करण्याची तयारी सुरु केली आहे. सध्या मुंब्य्राची लोकसंख्या ही वाढली असून येथे असलेले जलकुंभ हे २०११ पर्यंत पाणी पुरवठा होईल एवढेच होते. परंतु आता त्यात वाढ करणे अपेक्षित असल्याचे पालिकेचे म्हणने आहे. त्यानुसार आता एकूणच येथील पाणी वितरण व्यवस्थेचे रिमॉडेलिंग करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून यासाठी १२६ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. परंतु आता या योजनेत दिव्याचाही पालिकेने समावेश केला आहे. त्यामुळे हा खर्च आता १९६ कोटींच्या घरात गेला आहे. त्यानुसार मुंब्रा व दिवा भागासाठी आता ही रिमॉडेलींगची योजना राबविली जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.
                         मुंब्रा व दिवा विभागासाठी पाणी पुरवठ्याचे नियोजन हे पायाभूत वर्ष २०१८ धरुन पुढील ३० वर्षांसाठी वहन व्यवस्था व वितरण व्यवस्था गृहीत धरण्यात येणार आहे. जलकुंभ संप व पंप हाऊस १५ वर्ष कालावधीसाठी संकल्पीत करण्यात येतील, या योजनेसाठी महापालिकेची स्वत:ची योजना व एमआयडीसीकडून पाणी उपलब्ध करुन देणार आहे, मुंब्रा दिवा विभागासाठी मुख्य जल संतुलन टाकी बांधण्याचा समावेश करण्यात येणार आहे, नव्याने २०० मी.मी. ते १ हजार मी. मी. व्यासाच्या सुमारे १८ किमी लांबीच्या जलवाहीनी टाकण्यात येणार आहेत. तसेच या कामासाठी सल्लागाराचीही नेमणुक केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत नव्याने १० जलकुंभ बांधले जाणार असून आदी कामांसह इतर कामांचा यात समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार २०१८-१९ या वर्षात ३० कोटी, २०१९-२० मध्ये ९० कोटी आणि २०२०-२१ या कालावधीत ७६ कोटींचा खर्च केला जाणार आहे.

 

Web Title: Likewise, with the help of Mumbra, a remodeling scheme worth Rs. 196 crores is available.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.