प्रवासात मोबाइल चोरणाºया ‘टॉप २५’ची यादी अद्ययावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:35 AM2018-02-19T00:35:39+5:302018-02-19T00:35:50+5:30
शहर पोलिसांनी धूम स्टाइलने सोनसाखळी चोरणा-यांच्या मुसक्या आवळण्यासाठी ‘टॉप टष्ट्वेंटीफाइव्ह’चा अनोखा उपक्रम राबवला.
पंकज रोडेकर
ठाणे : शहर पोलिसांनी धूम स्टाइलने सोनसाखळी चोरणाºयांच्या मुसक्या आवळण्यासाठी ‘टॉप टष्ट्वेंटीफाइव्ह’चा अनोखा उपक्रम राबवला. रेल्वे प्रवासात किंवा स्थानकात मोबाइलचोरीची ‘बुलेट ट्रेन’ ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुसाट धावत असताना त्याला वेळीच ब्रेक लावण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी मोबाइल चोरट्यांची ‘टॉप २५’ ही यादी अद्ययावत केली आहे. यामुळे रेकॉर्डवरील चोरट्यांवर लक्ष राहीलच, त्याचबरोबर गुन्हे रोखण्यासाठी बºयापैकी फायदा होईल, असा विश्वास लोहमार्ग पोलिसांकडून वर्तवला जात आहे.
ठाणे लोहमार्ग पोलिसांची सीमा कोपरी पुलापासून सुरू होते. ती दिवा आणि कोपर रेल्वेस्थानकांच्या मधोमध अशी आहे. तसेच दिवा रेल्वेस्थानकापासून पुढे कळंबोली आणि ठाणे ते ऐरोली अशी पसरली आहे. ठाणे रेल्वेस्थानकातून मध्य आणि हार्बर लोकलसह एक्स्प्रेसद्वारे दररोज सहासात लाख प्रवासी प्रवास करतात. या वाढत्या प्रवासीसंख्येच्या तुलनेत लोहमार्ग पोलिसांचा फौजफाटा खूपच कमी आहे. त्यात रेल्वे प्रवासात मोबाइल चोरट्यांनी डोके वर काढल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दररोज ८ ते १० मोबाइलचोरीच्या घटनांची नोंद होत आहे. याआधी मोबाइलचोरीचे गुन्हे मिसिंगमध्ये नोंद केली जात होती.
जून २०१७ पासून लोकलमध्ये चोरीला जाणाºया मोबाइलबाबत थेट एफआयआर नोंदवण्यास सुरुवात झाली. त्यानुसार, मागील वर्षात ठाणे रेल्वे प्रवासात तब्बल ३,००२ मोबाइल चोरीस गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. या चोरीला गेलेल्या मोबाइलची किंमत चार लाख ९५ हजार ३८६ इतकी आहे. त्यापैकी २८९ गुन्हे उघडकीस आले असून हे प्रमाण अवघे १० टक्के असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मोबाइलच्या चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन रेल्वे पोलिसांनी पेट्रोलिंगवर विशेष भर देत मोबाइल चोरट्यांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. किती जण कारागृहात आणि किती बाहेर आहेत, याची इत्थंभूत माहितीही पोलिसांकडे असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे गुन्ह्याचा शोध लावणे सोपे झाले आहे.