सुनो मेरी आवाजमध्ये रसिकांनी धरला ठेका, वय विसरुन मनसोक्त लुटला नृत्याचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 04:36 PM2019-01-21T16:36:57+5:302019-01-21T16:40:06+5:30
सावनकुमार सुपे यांच्या ‘सुनो मेरी आवाज’ या हिंदी मराठी गीतांनी नटलेला कार्यक्र म रविवारी ब्रह्मांड कट्टयावर पार पडला.
ठाणे: आदमी मुसाफीर है, हाल क्या है दिलोंका ना पूछो सनम, यूही तुम मुझसे बात करती हो, अब के सावनमे जी डरे अशी एकापेक्षा एक गाण्यांनी रसिकांच्या हृदयाला स्पर्श करत भानच हरपायला लावले. सुरेल आवाजात गाणी ऐकत असताना कार्यक्रमाच्या शेवटी रसिकांनी पुढे सादर झालेल्या गाण्यांवर आपले वय विसरुन ठेका धरला. ‘सुनो मेरी आवाज’ या हिंदी मराठी गीतांनी नटलेला कार्यक्र म ब्रह्मांड कट्टयावर पार पडला
या कार्यक्रमाला रसिकांची अलोट गर्दी होती. हा कार्यक्रम नव्हे तर एक सोहळाच झाला. जीत कपूर यांनी कार्यक्रमाच्या निवेदनाची धूरा सांभाळली. मुकद्दर का सिकंदर या सिनेमातील कल्याणजी आनंदजी यांनी स्वरबध्द केलेले ‘दिल तो है दिल’ हे गीत शिखा या उदयोन्मुख गायिकेने सादर करुन कार्यक्रमाची सुरूवात केली. त्यानंतर सादर झालेल्या मेरे जीवन साथी चित्रपटातील ‘चला जाता हूँ’ या गीताने तर रसिकांचे मनच काबीज केले. लहानग्या यासीनने अरजित सिंगचे ‘मुस्कुराने की वजह तुम हो’ हे गाणे पेश करुन रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. सीमा चक्र वर्ती हिने काळजाला हातच घातला, तिने ‘रस्मे उल्फत को निभाये तो निभाये कैसे’ हे गीत सादर केले. सावन कुमार सुपे यांनी तर कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्यांनी व्यासपीछावर येताच ‘बहारो फुल बरसावो’ हे गाणे सादर करुन रसिकांकडून वाहवाची दाद मिळवली. या गाण्याची आठवण सांगताना ते म्हणाले की, काळीही स्पर्धा होती हे सिध्द होतं. कारण त्याचवेळी सदाबहार देव आनंद यांच्या नवकेतनचा गाईड चित्रपट प्रदर्शीत झाला होता. गाईडला सचिनदेव बर्मन यांचं आप्रतिम संगीत लाभले होते आणि गाईडला त्याकाळी फील्मफेअरची एकूण ११ नॉमिनेशन्स प्राप्त झाली होती. पण इतकी सुंदर गाणी गाईडमधे असून देखिल त्यावेळी सूरज मधील ‘बहारो फूल बरसावो’ला फील्मफेअर अॅवार्ड मिळाले होते असे सांगितले. सावन कुमार व शिखा यांनी ‘हसिना मान जायेगी’ या चित्रपटातील कल्याणजी आनंदजी यांनी स्वरबध्द केलेले ‘बेखुदी मे सनम उठ गये जो कदम’ हे द्वंद्वगीत सादर करु न रसिकांची वाहवा मिळवली. मग एका पेक्षा एक अशी सरस गाण्यांची जणू मैफीलच रंगली आणि रसिकांचे भान हरपले. यासिनने कैलाश खैर यांचे ‘तेरी दीवानी’, ‘तुला पाहते रे’ या मराठी मालिकेतील शिर्षक गीतांनी बहार उडवली. नंतर सुपे यांनी मन्नाडे यांचे मनोज कुमार यांच्या उपकार या चित्रपटातील ‘कस्मे वादे प्यार वफा सब’ हे गीत, यासिन याने नरेंद्र चंचल यांचे ‘मै बेनाम हो गया’ हे गीत सादर करु न रसिकांचे मन जिंकले. नंतर रु पक तालातील ‘किसी राहमे किसी मोडपर हे’ सावन/सीमा चक्र वर्ती व त्याच तालातील अभिमान मधील ‘तेरे मेरे मिलन की ये रैना’ हे गाणे राज व शिखा यांनी सादर केली. जयंत सदरे यांनी ढोलकीची साथ दिली. रसिकांनी आपले वय विसरुन या गाण्यांवर तालच धरला. ब्रह्मांड कट्ट्याच्या इतिहासात प्रथमच प्रेक्षक साडेदहा पर्यंत म्थांबले होते असे आयोजकांनी सांगितले. दरम्यान, ब्रह्मांडमधील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभही आयोजित केला होता.