लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या, शिर, हात कापून केले वेगळे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 05:42 AM2018-08-05T05:42:07+5:302018-08-05T05:42:28+5:30

एटीएममधून परस्पर २० हजार रुपये काढल्याने मोठा भाऊ सतत रागावत होता.

The little brother killed the big brother's murder, the head, his hands cut off | लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या, शिर, हात कापून केले वेगळे

लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या, शिर, हात कापून केले वेगळे

Next

मीरा रोड (ठाणे) : एटीएममधून परस्पर २० हजार रुपये काढल्याने मोठा भाऊ सतत रागावत होता. तो पैसे परत करण्याची मागणी करत होता, त्यातून लहान भावाने थेट मोठ्या भावाची हत्या करून शिर व हात कापून वेगळे केल्याची खळबळ घटना भार्इंदरमध्ये घडली. घटनेनंतर लहान भाऊ स्वत:च पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने हत्येची कबुली दिली.
जय पांडुरंग कृपा इमारतीत विल्फ्रेड पेट्राओ (३६) व त्याचा भाऊ सायमन (२१) राहतात. दोघेही अविवाहित असून त्यांचा एक भाऊ व्हिक्टर हा दुबईला, तर आणखी एख भाऊ नोबेल हा मालाडला राहतो. सदनिका व्हिक्टरच्या नावावर आहे. सायमन हा कॉल सेंटरमध्ये काम करायचा. सध्या तो बेरोजगार आहे. विल्फ्रेड हा बोरिवलीला सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. सायमनने विल्फ्रेडला न विचारताच त्याचे एटीएम कार्ड घेऊन २० हजार रुपये काढले होते.
त्यामुळे विल्फ्रेड संतापला होता. त्यावरून दोघांमध्ये भांडणे व्हायची. विल्फ्रेड हा सायमनकडे आपले पैसे परत कर, तगादा लावत होता. विल्फ्रेड कामावरून आल्यानंतर झोपलेल्या सायमनने बराच वेळ दार उघडले नाही. त्यामुळे दोघांमध्ये भांडण झाले. शनिवारी पहाटे ४ च्या दरम्यान सायमनने चाकूने विल्फ्रेडच्या छातीत वार केले. त्याचा जागीच मृत्यू झाला. सायमनने त्याचे शिर व दोन्ही हात लहान करवतीने कापले. ते प्लास्टिकमध्ये बांधून बाथरूममध्ये तर धड व पाय हे बेडरूममध्ये बांधून ठेवले. दुपारी सायमन स्वत:च नवघर पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांना त्याने भावाची हत्या केल्याचे सांगितले. सायमनला अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक राम भालसिंग यांनी सांगितले.

Web Title: The little brother killed the big brother's murder, the head, his hands cut off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.