ठाणे जिल्ह्यास भारनियमनाचे चटके; सात तास बत्ती गुल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:26 AM2018-10-11T00:26:20+5:302018-10-11T00:26:35+5:30

मुंब्य्रातील वीजसमस्येच्या मुद्द्यावरून स्थानिक आमदारांनी जाळपोळ करण्याचा इशारा दिला असताना, भारनियमनाचे चटके केवळ ठाणे शहरच नव्हे, तर ग्रामीण भागासही सहन करावे लागत आहे.

load shedding in Thane district; Seven hours light bulb | ठाणे जिल्ह्यास भारनियमनाचे चटके; सात तास बत्ती गुल 

ठाणे जिल्ह्यास भारनियमनाचे चटके; सात तास बत्ती गुल 

Next

- अजित मांडके

ठाणे : मुंब्य्रातील वीजसमस्येच्या मुद्द्यावरून स्थानिक आमदारांनी जाळपोळ करण्याचा इशारा दिला असताना, भारनियमनाचे चटके केवळ ठाणे शहरच नव्हे, तर ग्रामीण भागासही सहन करावे लागत आहे. ऐन सणासुदीच्या काळात अचानक वाढलेल्या मागणीमुळे पुरवठा करणे शक्य नसल्याने अघोषित भारनियमन सुरू करण्यात आल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली आहे. ज्या भागात वीज देयकांची वसुली कमी आहे, त्या भागांमध्येही भारनियमन सुरू आहे.
राज्यात अनेक ठिकाणी महावितरणच्या वतीने भारनियमन सुरू करण्यात आले आहे. आॅक्टोबर हीट आणि ऐन सणासुदीच्या काळात महावितरणने सुरू केलेल्या अघोषित भारनियमानुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. कळवा, मुंब्रा, कौसा, दिवा या भागात सध्या ६ ते ७ तासांचे अघोषित भारनियन सुरु आहे. कल्याण, डोंबिवलीच्या ग्रामीण भागासह, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर आदीसह इतर ग्रामीण भागात सध्या अघोषित भारनियमन सुरू आहे. काही ठिकाणी सकाळच्या सत्रात तर काही ठिकाणी संध्याकाळच्या सत्रात भारनियमन सुरू आहे.
आॅक्टोबर हीटमुळे अचानक विजेची मागणी वाढली आहे. त्यात परतीच्या पावसानेसुद्धा हजेरी न लावण्याने शेतकऱ्यांनी पंप सुरु करुन पाण्याचा उपसा सुरु केला आहे. त्यामुळे विजेची मागणी वाढली आहे.

मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत
सध्या राज्यात विजेची मागणी सुमारे १९५०० मेगावॅट एवढी असून विजेची उपलब्धता सुमारे १६००० ते १७००० मेगावॅट आहे. त्यामुळे दोन हजार ते २ हजार ५०० मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली आहे.
विजेची मागणी आणि पुरवठा यांच्यात ताळमेळ बसत नसल्याने भारनियमन सुरू करावे लागल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
भारनियमनातून शहरी भाग वगळण्यात आला आहे. ज्या ठिकाणी विजेचा पुरवठा होत आहे; परंतु वसुली कमी होत आहे, अशा भागात सुरू असल्याचे महावितरणने स्पष्ट केले. मागणी आणि पुरवठ्यातील समतोल साधला गेला, तर भारनियमन बंद होईल, असा दावा महावितरणने केला.

Web Title: load shedding in Thane district; Seven hours light bulb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे