कर्जमाफी योजना : ३०० लाभार्थ्यांचा शोध सुरू, वृद्धत्वामुळे पुरावे देणे अशक्य झाल्याने राहिले वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 06:46 AM2018-02-03T06:46:32+5:302018-02-03T06:46:57+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र असलेल्या परंतु वृद्धत्वामुळे बोटांचे ठसे स्कॅन करता न आल्याने अद्याप लाभ न झालेल्या सुमारे ३०० शेतक-यांचा शोध घेऊन त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याच्या हालचाली सुरू आहेत.

Loan Approval Scheme: 300 beneficiaries were searched for, old age remained unavoidable due to lack of evidence | कर्जमाफी योजना : ३०० लाभार्थ्यांचा शोध सुरू, वृद्धत्वामुळे पुरावे देणे अशक्य झाल्याने राहिले वंचित

कर्जमाफी योजना : ३०० लाभार्थ्यांचा शोध सुरू, वृद्धत्वामुळे पुरावे देणे अशक्य झाल्याने राहिले वंचित

Next

- सुरेश लोखंडे
ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र असलेल्या परंतु वृद्धत्वामुळे बोटांचे ठसे स्कॅन करता न आल्याने अद्याप लाभ न झालेल्या सुमारे ३०० शेतक-यांचा शोध घेऊन त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याच्या हालचाली सुरू आहेत.
जिल्ह्यात एक हेक्टर शेती असलेल्या आठ हजार ८३२ लहान शेतकºयांचा, तर दोन हेक्टरपर्यंतच्या पाच हजार २५८ मध्यम शेतकºयांचा समावेश आहे. उर्वरित ७३८ मोठे शेतकरी आहेत. जिल्ह्यातील नऊ हजार ८२८ शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये पात्र असलेल्या पण बोटांचे ठसे स्कॅन न झाल्यामुळे योजनेचा लाभ न झालेल्या सुमारे २५० ते ३०० वयोवृद्ध शेतकºयांचा समावेश आहे. त्यांचा शोध घेऊन त्यांनाही या कर्जमाफीचा लाभ देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे डीडीआर एस.एम. पाटील यांनी सांगितले. या विषयावर मंत्रालयात चर्चा झाल्याचे ते म्हणाले.
सुमारे दीड लाख कर्ज असलेल्या शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. दीड लाखापेक्षा कमी कर्ज असलेल्या ठाणे जिल्ह्यातील १४ हजार ७३५ शेतकºयांच्या खात्यात ४५ कोटी ७९ लाख २३२ रुपये जमा केले आहेत. त्यापैकी सात हजार ४९८ थकबाकीदार शेतकºयांना ३४ कोटी ४९ लाख ३१ हजार २८ रु पये, प्रोत्साहनपर रकमेचा लाभ मिळाला आहे.

दीड लाख कर्ज असलेल्या शेतकºयांना माफी

सुमारे दीड लाख कर्ज असलेल्या शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. दीड लाखापेक्षा कमी कर्ज असलेल्या ठाणे जिल्ह्यातील १४ हजार ७३५ शेतकºयांच्या खात्यात ४५ कोटी ७९ लाख २३२ रुपये जमा केले आहेत. दीड लाखाच्यावर थकबाकीची रक्कम असलेले ठाणे जिल्ह्यात एक हजार ७३७ व पालघरमधील एक हजार ४८८ असे मिळून तीन हजार २२५ शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरले आहेत. परंतु, त्यांच्याकडील थकबाकी असलेली २८ कोटी ५६ लाख १३ हजार ९०२ रुपये त्यांनी ३१ मार्च २०१८ पर्यंत त्यांना भरणे अपेक्षित आहे.

Web Title: Loan Approval Scheme: 300 beneficiaries were searched for, old age remained unavoidable due to lack of evidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.